मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health Tips: किडनीचं आरोग्य राखण्यासाठी सोप्या टिप्स, शरीर राहील फिट

Health Tips: किडनीचं आरोग्य राखण्यासाठी सोप्या टिप्स, शरीर राहील फिट

How to Keep Kidney Healthy: किडनीचं आरोग्य उत्तम राखणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. जाणून घ्या कसं करायचं हे.

How to Keep Kidney Healthy: किडनीचं आरोग्य उत्तम राखणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. जाणून घ्या कसं करायचं हे.

How to Keep Kidney Healthy: किडनीचं आरोग्य उत्तम राखणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. जाणून घ्या कसं करायचं हे.

मुंबई, 10 मार्च : आपल्या शरीरात दोन किडन्या असतात. यांचं काम असतं रक्त शुद्ध करणं. किडनी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यात किडनीची भूमिका कळीची असते. (How to Keep Your Kidney Healthy). किडनी रक्तातून अशुद्ध तत्व, अतिरिक्त पाणी आणि इतर अशुद्धी दूर करते. किडनीचं काम असतं रक्त पुन्हा हृदयाला पाठवण्याआधी फिल्टर करणं आणि लघवीच्या रूपात अशुद्ध द्रव्य आणि इतर नकोशा गोष्टी बाहेर काढणं. (Kidney Health Tips)

किडनी रक्त स्वच्छ करते आणि शरीरातून सगळे विषारी पदार्थ बाहेर काढते मात्र चुकीची जीवनशैली आणि जास्त औषधांच्या सेवनानं किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी शरीरातील या खास अवयवांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आहारात काही गोष्टी नक्की घ्या.

डायटमध्ये या गोष्टी घ्या

आहारात फळं आणि भाज्या नक्की समाविष्ट करा. यातून किडनीचे आजार दूर ठेवता येतील. मात्र ज्या लोकांना आधीपासून किडनीचे त्रास आहेत त्यांनी कमी पोटॅशियम असलेले खाद्यपदार्थ आहारात घ्यावे. (How to Keep Kidney Healthy)

वजनावर ठेवा  नियंत्रण

वजन वाढल्यानं अनेक आजार होऊ शकतात. मधुमेह, हृदय रोग, किडनीचे आजारसुद्धा होऊ शकतात. त्यामुळं संतुलित आहार घ्या. तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. आहारात फुलगोबी, ब्लूबेरी, कडधान्य यांचा समावेश करा. हायपरटेन्शन आणि मधुमेहामुळं किडनीवर ताण येतो. कुटुंबात कुणाला या दोन्हीपैकी एखादी समस्या असेल तर तुम्ही नियमित रक्तदाब तपासत रहा. (What To Do For Keeping Kidney Healthy)

हेही वाचा मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी लावा या 6 हेल्दी सवयी; तणावापासून राहा दूर

पुरेसं पाणी प्या

किडनी चांगली ठेवण्यास पुरेसं पाणी प्या. सोबतच ज्यूस वगैरे पित रहा. तुम्ही शारीरिक मेहनत जास्त करत असाल तर तुम्हाला जास्त पाण्याची गरज असते. मात्र दिवसभर किती पाणी प्यावं याबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. पुरेसं पाणी पिल्यानं शरीरातून विषारी पदार्थ लघवीतून निघून जातात.

हेही वाचा  गुलाबी रंगात का रंगलं मुंबईचं हे रेल्वे स्टेशन? पाहा PHOTO

वेदनाशामक औषधं घेणं टाळा

जास्त औषधं घेतल्यानं किडनीचं नुकसान होतं. सतत वेदनाशामक औषधं घेऊ नका. हे किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. घ्यायचीच असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या.

(Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Drink water, Health Tips