मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दिवसभराच्या कष्टानंतर पाहिजे चांगली झोप? ही आहेत सिक्रेट्स, नक्की करा ट्राय

दिवसभराच्या कष्टानंतर पाहिजे चांगली झोप? ही आहेत सिक्रेट्स, नक्की करा ट्राय

आनंदी आयुष्यासाठी चांगली झोप मस्ट आहे. कशी मिळवायची ती?

आनंदी आयुष्यासाठी चांगली झोप मस्ट आहे. कशी मिळवायची ती?

आनंदी आयुष्यासाठी चांगली झोप मस्ट आहे. कशी मिळवायची ती?

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 मार्च : निरोगी राहण्यासाठी चांगली झोप कमालीची आवश्यक आहे. दिवसभर सक्रिय राहण्यासाठी, शिवाय दिवसभर ताजंतवानं वाटावं यासाठी झोप पुरेशी झाली पाहिजे. (Secrets of good nights sleep)

जेव्हा झोप पूर्ण होत नाही तेव्हा दिवसभर जड, थकलेलं आणि तणावग्रस्त वाटणं साहजिक आहे. झोप न झाल्यास अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. अनेकांना ताण, चिंता असल्यानं झोप येत नाही. काही लोक अशावेळी झोपेच्या गोळ्या घेतात. याशिवाय काही सोपे उपाय करून तुम्ही चांगल्या झोपेचा आनंद घेऊ शकता. (tips to get good sleep)

झोपण्या आणि उठण्याची वेळ एकच असावी

झोपेची एक वेळ बनवा. दररोज वेळेवर झोपण्या आणि उठण्यानं दिवसा थकवा किंवा चिडचिड उद्भवणार नाही. तुम्हाला चांगलं वाटत राहील. एका प्रौढ माणसाला रात्री 7 ते 8 तास झोप गरजेची असते. सुरवातीला यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मात्र एकाच वेळी झोपणं आणि जागणं यामुळं शरीराला याची सवय होईल. चांगली झोप यावी यासाठी झोपण्याआधी तुम्ही गरम पाण्यानं अंघोळ करू शकता. आवडीचं पुस्तक वाचू शकता. मात्र मोबाईलपासून नक्की दूर राहा. व्हिडिओ गेमसुद्धा खेळू नका. यातून मानसिक थकवा येतो. (ways to get good sleep)

बेडरूमचं वातावरण छान बनवा

मंद प्रकाश, शांत वातावरण आणि हलका सुवास असेल तर झोप नक्कीच चांगली येईल. अंधार मेंदूला ही झोपेची वेळ असल्याची सूचना देतो. सुगंधी मेणबत्त्या वातावरण सुंदर बनवतात. यातून मस्त झोप लागते. (secrets to good sleep)

आरामदायी गादी-उशी पाहिजे

हे नक्की बघा, की तुमची गादी आरामदायी आणि चांगली झोप येण्यास मदतशील असावी. चांगल्या गुणवत्तेची गादी निवडा. उशीनं तुम्हाला रिलॅक्स केलं पाहिजे. शिवाय एखादा इलेक्ट्रिक बॉडी मसाज तुमच्या शरीराला आराम देऊ शकतो. (what to do for a good night sleep)

हेही वाचा तुमचा ब्लड ग्रुप तर हा नाही ना? मग तुम्हाला आहे हार्ट अटॅकचा धोका

बेडरूमचं तापमान सेट करा

बेडरूमचं तापमान संतुलित असलं पाहिजे. ते खूप गरम किंवा खूप थंड नसावं. अन्यथा झोपेचं खोबरं होऊ शकतं. एका संशोधनानुसार, तज्ञ सांगतात, की खोलीचं तापमान 20 ते 24 डिग्रीच्या दरम्यान असावं.

हेही वाचा मी नाही तुम्हीच आयुष्यभर करा माझं पालनपोषण! 41 वर्षीय इसमाने पालंकावरच भरला खटला

घोरण्याची समस्या दूर करा

घोरणं ही एक सामान्य अवस्था आहे. ही कुणालाही वैताग देऊ शकते. घोरणं हे पुरुष आणि जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये बहुतेकदा दिसतं. घोरणं सामान्यतः गंभीर नसतं. मात्र त्यातून इतरांची झोप खराब होऊ शकते. म्हणून एकूणच जीवनशैलीत बदल गरजेचा आहे.

First published:

Tags: Health, Health Tips