जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पती-पत्नीच्या नात्यातील दुरावा वाढण्याची ही आहेत 7 लक्षणं

पती-पत्नीच्या नात्यातील दुरावा वाढण्याची ही आहेत 7 लक्षणं

पती-पत्नीच्या नात्यातील दुरावा वाढण्याची ही आहेत 7 लक्षणं

दोघांसाठी भावनिक गुंतवणूक टिकून राहण्यासाठी सेक्शुअल रिलेशनलाही (Sexual Relations) महत्व आहे. स्त्री आणि पुरूषांच्या याबाबतीतल्या अपेक्षा (Expectations) आणि गरजा (Needs)वेगवेगळ्या असतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 जुलै : एका चांगल्या रिलेशनशीपसाठी (Relationship) पतीपत्नीमध्ये जेवढ भावनिक नातं (Emotional relationship) महत्वाचं असतं. तेवढच शरीर संबंधांनाही महत्व असतं. दोघांसाठी भावनिक गुंतवणूक टिकून राहण्यासाठी सेक्शुअल रिलेशनलाही (Sexual Relations) महत्व आहे. स्त्री आणि पुरूषांच्या याबाबतीतल्या अपेक्षा (Expectations) आणि गरजा **(Needs)**वेगवेगळ्या असल्या तरी, आवश्यकता दोघांनाही असते. फक्त व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. कितीही घट्ट नातं असलं तरी, वेगवेगळ्या वळणावर त्यांच्या कक्षा बदलत असतात. त्यावेळी गरज असते समजूतदारपणाची. पतीपत्नीच्या नात्यात रोमान्सही महत्वाचा आहे.पण, कालांतराने नात्यातलं आकर्षण कमी व्हायला लागतं. त्यामुळे पत्नी सेक्ससाठी नकार द्यायला लागते. अशा वेळेस पुरूषांच्या मनात अनेक शंका येतात. आज याच संदर्भातल्या कारणांची माहिती घेऊयात. ( पचायला जड म्हणून नका थांबवू डाळ खाणं; शिजवायची पद्धत बदलून बघा ) सेक्सचा त्रास वयानुसार पुरूष आणि महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस (Hormonal Changes) व्हायला सुरुवात होते. त्यामुळे महिलांच्या मनात सेक्सबद्दल आकर्षण कमी व्हायला लागत. अशा वेळी तिचा मूड जाणून घ्या. आपल्या पत्नीला तुमच्या इच्छेची जाणीव करून द्या. दुरावा दूर करा पत्नीबरोबर केवळ सेक्ससाठी जवळीक साधू नका. उटल जेव्हा शक्य आहे तेव्हा रोमँटीक राहण्याचा प्रयत्न करा. तिला सकाळी गुडमॉर्निंग किस करा, बाहेर गेल्यावर तिचा हात हातात घ्या. नात्यामध्ये स्पर्श महत्वाचा असतो. तुमचा स्पर्श तिला तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देईल. सेक्सकडे लक्ष देण्यापेक्षा तिच्या मूडचा विचार करा. ( Ideal couple होण्याची हीच वेळ! बेरोजगरीच्या काळात जोडीदाराची द्या साथ ) सेक्समध्ये नावीन्य सेक्स करताना नेहमीचा तोचतोपणा जाणवत असेल तर, त्याबद्दलही पत्नीबरोबर बोला. एकाचवेळी, एकाच ठिकाणी, त्याच नेहमीच्या सवयीने सेक्स केल्यावर त्यातील नावीन्य आणि आकर्षण संपल्यासारखं वाटत असेल तर, इंटीमसीसाठी नवीन गोष्टी ट्राय करा. ज्यामुळे तिचा उत्साह वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशन्स स्ट्रेस आपली पत्नी वर्किंग वुमन असेल तर, तिच्या कामाच्या ठिकाणी काही स्ट्रेस असेल तर, त्याने तिला थकल्या सारखं वाटू शकतं. त्यामुळे तिच्याशी बोलून टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा घरातल्या कामांमुळे पत्नी थकत असेल तर, तिला कामात मदत करा. ज्यामुळे तिला कमी थकल्यासारखं वाटेल. ( कोशिंबीरमध्ये वापरा हे पदार्थ; वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ) उदासीनता पत्नी एखाद्या कारणामुळे उदास असेल तर, अशावेळी तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल तर, समजुतदारपणे वागा. तिच्या उदास राहण्याची कारणं शोधा. डिप्रेशनमध्ये असलेल्या माणसाचा मूड आणि वागणं नकारात्मक होऊ शकतो. अशावेळी तिच्याशी चर्चा करून तिला मदत करा. ( तुमच्या शरीरात दिसतात ही लक्षणं; असू शकते Vitamin C ची कमतरता ) पत्नी नाराज असेल सेक्सची इच्छा महिला किंवा पुरूष यांच्यात कशा प्रकारचं नातं आहे याची जाणीव करुन देते. पत्नी नाराज,नाखुश असेल तर, तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल. अशावेळी तिच्या बोलून नाराजीचं कारण जाणून घ्या आणि तिची नाराजी दूर करा. तुमच्यावर विश्वास नाही कोणत्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो. पत्नी इंटीमसीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असेल तर, ती तुम्ही एखादं प्रॉमिस तोडल्यामुळे किंवा फसवणूक केल्यामुळेही असू शकतं. त्यामुळे आपल्या झालेल्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करा. तिची माफी मागा आणि तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात