मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship: Ideal couple होण्याची हीच वेळ! अवघड काळात जोडीदाराची द्या साथ

Relationship: Ideal couple होण्याची हीच वेळ! अवघड काळात जोडीदाराची द्या साथ

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

Ideal कपल होण्यासाठी अडचणीच्या, बेरोजगारीच्या काळातच एकमेकांना साथ द्यायची गरज असते. आपलं मनोबल खचून न देता जोडीदाराला साथ देण्यातच खरी कसोटी असते.

  • Published by:  News18 Desk
दिल्ली,31 मे : प्रत्येकाच्या करियरमध्ये(Career)चढ-उतार येत असतात,आपल्यावर जेव्हा संकटं (Crisis)किंवा अडचणी(difficulties) येतात तेव्हा आपण त्यांचा सामना करू शकतो. पण, जेव्हा जोडीदाराच्या करियरचे प्रॉब्लेम (Career Problem)  असतात. तेव्हा तो आपल्यासाठीही संवेदनशील मुद्दा बनतो. अशा कठीण परिस्थितीत(Difficult Condition)बरेचजण आपल्या जोडीदाराचा आधार बनतात. पण, याच काळात नात्यांना नवीन वळणही (New Twist to Relationships) लागतं. काहीवेळा जोडीदाराने खरी परिस्थिती लपवल्यामुळे आणि तणाव वाढल्याने घरातच वादविवाद व्हायला लागतात. ब्लेम गेममुळे परिस्थिती हाताबाहेर जाते आणि करियरवरही परिणाम होतो. एवढेच नही तर,जास्त दिवस नात्यात तणावाच वातावरण राहिल्याने एकमेकांमधील अंतरही इतकं वाढतं की नंतर काहीही करुन कमी करता येत नाही. अशा परिस्थितीत जोडीदाराच्या करियरमध्ये अडचणी वाढत असताना नातं टिकवण्यासाठी त्याचा आधार बनण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या करियरमध्ये अडचणी येत असतील तर, त्याला आधार देण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा. (सायकल गर्ल ज्योतीच्या वडिलांचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर) शांत राहा जोडीदाराच्या कारियर मधील प्रॉब्लेमने तुमच्या आयुष्यावरही परिणाम होतो. दोघांपैकी एकाने नोकरी गमावली तर, घराच्या बजेटमध्ये नक्कीच अडचण येऊ शकते. आपल्या येणाऱ्या पगाराप्रमाणे आपण आपले खर्च ठरवत असतो. नोकरी गेल्यावर घराचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न निर्माण होतो.तर, भविष्याचे काही प्लॅनही बिघडतात पण, अशा नकारात्मक परिस्थितीतही शांत राहा.जर आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. जोडीदार काही बोला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा. (शेजारच्या राज्यात Black Fungus चा कहर, एकाच दिवशी 1250 जणांना लागण) ऐकण्याची क्षमता वाढवा आपला जोडीदार आपल्याशी काही टेन्शनबद्दल बोलत असेल तर, धीराने ऐका. बर्‍याच वेळा, फक्त ऐकण्याने समोरच्याचं मन हलकं होतं आणि त्यातून बाहेर येण्याची सक्षम वाढते. आपला जोडीदार सकारात्मक विचार करू लागला आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असेल तर, त्याची हिम्मत आणि आत्मविश्वास वाढवा. इतरांशी चर्चा नको काही लोकांना घरातल्या गोष्टी लोकांना सांगण्याची सवय असते. पण काही खाजगी गोष्ट आपले मित्र आणि कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितल्यास, आपल्या जोडीदाराला वाईट वाटण्याची शक्यता आहे. ज्यांना तुम्ही खाजगी गोष्टी किंवा जोडीदाराच्या नोकरीतल्या अडचणींबद्दल सांगत असाल त्यांना भेटताना जोडीदाराला लाज वाटू लागेल किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होईल. (नुकतीच झाली होती कोरोनामुक्त, घरी जात असताना अपहरण करुन केला बलात्कार) नवीन नोकरी शोधण्यात मदत करा नेहमी जोडीदाराला तो एकटा नसून तुम्ही त्याच्याबरोबर असल्याची जाणीव करून द्या. तो नोकरी शोधत असेल तर, त्याची हिम्मत वाढवा. जोडीदाराची पात्रता आणि फील्ड यानुसार शक्य असेल तिथे नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. रेज्युमे अपडेट करणं किंवा जॉब पोर्टलवर अपलोड करणं यात मदत करा. जोडीदाराला त्याच्या क्षेत्राशीसंबंधीत काही कोर्स करायचा असेल तर, त्याला पाठिंबा द्या. नव्याने बजेट बनवा वाईट काळात जवळच्या माणसांची साथ हवी असते. त्यामुळे एकमेकांना पाठिंबा द्या. दोघांचा एकूण खर्च किती आहे आणि पुढील काळात कोणता खर्च कामी करता येईल ते ठरवा. बजेट पुन्हा तयार करा. काही लक्झरी गोष्टींची सवय बंद करा. लक्षात ठेवा हे वाईट दिवसही निघून जातील.
First published:

Tags: Couple, Lifestyle, Relationship

पुढील बातम्या