मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Promises : प्रेमळ नात्यासाठी आपल्या पार्टनरची अशी घ्या काळजी; नात्यात वाढेल ओलावा

Relationship Promises : प्रेमळ नात्यासाठी आपल्या पार्टनरची अशी घ्या काळजी; नात्यात वाढेल ओलावा

आपल्या धावपळीच्या या आयुष्यात आपल्या लाईफ पार्टनरला वेळ देणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे जून्या आणि नव्या लाईफ पार्टनरला (Relation with GF) आता या गोष्टींमुळे एकटेपणाचा सामना करावा लागत आहे.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : आपल्या धावपळीच्या या आयुष्यात आपल्या लाईफ पार्टनरला वेळ देणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या लाईफ पार्टनरला (Relation with GF) आता या गोष्टींमुळे एकटेपणाचा सामना करावा लागत आहे. आपल्याला आपल्या पार्टनरसोबत चांगल्या (Relationship Promises) लाईफची सतत अपेक्षा असते. त्यात दोघांनाही आनंद मिळावा असं दोघांना कायम वाटतं. परंतु त्यातल्या एकालाही वेळ देता आला नाही तर त्या नात्यात दूरावा निर्माण होतो आणि त्या नात्याला पुन्हा पहिल्यासारखं चांगलं (Relationship Challenging) बनवणं फार कठीण होत जाते. अशा वेळी आपल्याला काही गोष्टी सांभाळून घेण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागते. त्यावेळी आपल्या हातातून अनेक गोष्टी बाहेर पडत असतात. त्यामुळे आपल्याला आता या परिस्थितीला कसं सामोरं जावं किंवा आपल्याला आपल्या पार्टनरला कायम खूश ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा काळजी घ्यायला हवी, याविषयी आपण जाणून घेऊयात. रिलेशनशिपमध्ये दोघांनीही एकमेकांना नेहमी समजून घेऊन वेळ दिला पाहिजे, त्याचबरोबर एकमेकांच्या अडचणी समजून त्यावर मनमोकळेपणाने चर्चा करायला हवी, त्यामुळे आपले मन हलके होते. एखाद्या वेळी आपल्याकडून किंवा आपल्या पार्टनरकडून काही चूक झाली असेल तर त्यावर न ओरडता त्याला किंवा तिला समजून सांगायला हवं. चांगल्या वेळेत खूश रहायला हवं तर वाईट वेळेत भक्कमपणे साथ द्यायला हवी. कारण रिलेशनशिपमध्ये विश्वास हा फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं? दोघांप्रती एकमेकांना अपार विश्वास असायला हवा. त्याचबरोबर आपल्या पार्टनरला कोणत्या गोष्टींमुळे आनंद होईल आणि कोणत्या गोष्टींमुळे दुख: होईल हे ओळखता आले पाहिजे, कारण त्यामुळे नात्यातील बॉंडींग वाढत असते. त्याचबरोबर नात्यात प्रामाणिक असणं हे फार महत्त्वाचं असतं. One Sided Relationship : एकतर्फी प्रेमामुळे वाढत आहे एकटेपणा; जरा हे वाचा कारण आपण आपल्या पार्टनरसाठी सर्व काही असतो, आणि आपण जर प्रामाणिक राहिलो नाही तर आपल्या विश्वासाला आणि त्या प्रेमळ नात्याला तडा जातो, त्यामुळे आपण आपल्या पार्टनरच्या गरजा आणि त्यांची भावना ओळखून त्यानुसार वागलं तर आपल्या नात्यांमध्ये प्रेमळता निर्माण होऊन विश्वास वाढतो.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health Tips, Relationship tips, Relationships, Social media and relationships

    पुढील बातम्या