मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं ठरू शकतं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं?

केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं ठरू शकतं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं?

मेहंदी लावताना (Tips while applying Mehandi) पुरेशी काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्याचा विपरित परिणाम केसांवर होईल.

मेहंदी लावताना (Tips while applying Mehandi) पुरेशी काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्याचा विपरित परिणाम केसांवर होईल.

मेहंदी लावताना (Tips while applying Mehandi) पुरेशी काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्याचा विपरित परिणाम केसांवर होईल.

  • Published by:  Atik Shaikh

दिल्ली, 22 सप्टेंबर : भारतात आपण चांगलं दिसावं म्हणून आपल्या केसांना चमकावणाऱ्या लोकांची कमी नाही. केस हे आपल्या सुंदरतेचं प्रतीक असतात. जेवढे केस चांगले, चमकदार आणि दाट तेवढा आपला चेहरा खुलून दिसतो, त्यामुळे आता अनेकजण आपल्या केसांना चमकवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लृप्त्या करत असतात. केस अकाली पांढरे व्हायला लागले तर प्रामुख्याने मेहंदीचा वापर (How to apply Mehandi on hair) केला जातो. कारण एकदा मेहंदी लावल्यानंतर काही वेळातच आपण आपल्या केसांचा बदललेला कलर (mehandi For hair) पाहून खूश होतो. मेहंदीने केसांंचं आरोग्य सुधारतं आणि केसांना छान रंग चढतो. पण मेहंदी लावताना (Tips while applying Mehandi) पुरेशी काळजी घ्यायला हवी. नाहीतर त्याचा विपरित परिणाम केसांवर होईल.

आपके हसीं पैर... पावसाळ्यात काळजी घेतली नाहीत तर असतो Infection चा धोका

परंतु केसांचे कलर बदलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे आता त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही दिसायला सुरूवात झाली आहे. कारण केसांच्या आरोग्यासाठी (mehandi) मेहंदी हा काही शाश्वत उपाय नाही आहे. कारण मेहंदीला 10-15 मिनीटांत लावणे आणि वापरणे ठिक आहे परंतु तासनतास ती केसांना लावलेलीच ठेवणे हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यासाठी काय करायला हवं, याविषयी काही माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Makeup And Sleep : तुम्हीही रात्री मेकअप न काढताच झोपता? त्वचेवर होतील हे गंभीर

आपण जेव्हा मेहंदी लावून काही तासांसाठी तशीच ठेवतो, त्यावेळी आपल्याला त्याचे काही परिणाम जाणवायला लागतात. कारण जास्त वेळ आपण केसांवर मेहंदी ठेवली तर आपल्या केसांचे आयूष्य कमी होते. त्यामुळे दिड तासांच्या आत आपण आपल्या केसांना लावलेली मेहंदी काढायला हवी. त्यामुळे आपण आपल्या होणाऱ्या विपरित परिणामांपासून केसांना वाचवू शकतो. त्याचबरोबर आपण जेव्हा कधी केसांना मेहंदी लावतो तेव्हा आपण त्याला गार पाण्यानेच धुवायला हवे. कारण त्याने केसांना फार विशेष काही धोका होत नाही. त्याचबरोबर आपण नेहमी मेहंदी लावल्यानंतर आधी आपल्या केसांना धूताना त्याला शॅम्पूने धुवायाला हवे, त्यानंतर प्रमाणानुसार तेल लावल्याने आपल्या केसांचे आरोग्य राखले जाऊ शकते.

(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

First published:

Tags: Health Tips, Woman hair, Women hairstyles