दिल्ली, 20 जून: काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टार उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आणि मड थेरपीची (Mud Therapy) चर्चा जोरात सुरू झाली. यात ती मड थेरपी घेतांना दिसत होती. मड थेरपी अनेक वर्षापासून वापरली जाते, पण, अजूनही सामान्य लोकांना याबद्दल फारशी माहिती नाही. जाणून घेऊयात मड थेरेपी आणि त्याचे फायदे.मड थेरेपी म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर, शरीरावर चिखल लावण्याला मड थेरपी म्हणतात. निसर्गोपचार म्हणजेच नॅचरोपॅथीमध्ये (Naturopathy) मातीच्या पट्टी किंवा मातीची पेस्ट यांच्या सहाय्याने बर्याच रोगांचा उपचार केला जातो. या थेरपीद्वारे स्किन प्रॉब्लेम आणि डिप्रेशन सारख्या आजारात या थेरपीद्वारे बर्याच रोगांवर उपचार केले जातात. ही माती पूर्णपणे केमिकल फ्री आणि स्वच्छ असते.
(त्याचा फक्त एकच हात देतोय कित्येकांना जीवदान; या दिव्यांगाला तुम्हीही कराल सलाम)
मड थेरपीसाठी, विशिष्ट प्रकारची माती जमिनीमधून 4 ते 5 फूट खालून काढली जाते. या मातीत ऍक्टिनोमाइसेट्स नावाचा एक बॅक्टेरिया आढळतो. जो वातावरणानुसार त्याचं रूप बदलतो. जेव्हा तो पाण्यात मिसळतो तेव्हा, त्यात बरेच बदल होतात. यामुळे या ओल्या मातीत सुंदर सुवास येतो.
(संधी सोडू नका, भरपूर खा! फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या)
त्वचेसाठी मड थेरपी
मड थेरपी घेतल्यास त्वचेसंदर्भातील समस्या दूर होतात. शरीरावरील सुरकुत्या,मुरुम,त्वचेचा कोरडेपणा,डाग,पांढरे डाग,कुष्ठरोग,सोरायसिस आणि इसब यावर उपचार करता येता. मड थेरपी घेतल्याने त्वचेची चमक वाढते, त्वचा टाईट होते आणि त्वचा मऊ होते.
(जोडीदाराची नोकरी गेली;सोडू नका साथ;आयुष्याच्या याच वळणावर सिद्ध करा प्रेम)
मड थेरपी फायदेशीर आहे
मड थेरपी घेतल्यास पचनशक्ती सुधारते. आतड्यांमधील उष्णता दूर होतात. अतिसार,उलट्यांचा त्रास होत असेल तर दूर होतो. बद्धकोष्ठता,फॅटी लिव्हर,कोलायटिस,दम,हाय ब्लड प्रेशर,लठ्ठपणा, मधुमेह,मायग्रेन आणि डिप्रेशन सारख्या समस्यांवर मात करण्यास देखील मदत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Skin care