दिल्ली, 19 जून : दूध आरोग्यासाठी फारच चांगलं (Health Benefits of Milk) आहे. दुधामध्ये कॅल्शियम, राइबोफ्लेविन,फॉस्फरस,व्हिटॅमिन डी, पॅन्टोथेनिक ऍसिड,पोटॅशियम,व्हिटॅमिन ए आणि नियासिन कॅलरीजने भरपूर असलेलं दूध एक उत्तम आहार आहे. लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाचं दूध आवडतं. दुधात लॅक्टोज (Lactose) असतं काही लोकांना दुधात त्यामुळे पचन करण्यास त्रास होऊ शकतो. लॅक्टोज मेंदूच्या विकासात (Brain Development) मदत करतं. पण, आवडत असूनही मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes Patient) दूध पिता येत नाही. कारण, दूध मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगलं नसतं असा एक समज आहे. पण हे किती खरं?
डायबेटिसच्या रुग्णांना दुधाने त्रास होतो हा समज चुकीचा ठरवणारं एक संशोधन झालेलं आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते दूध मधुमेहासाठी खरोखर फायदेशीर(milk beneficial for Diabetes) आहे.
स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये (Scandinavian Countries) करण्यात मांडलेल्या एका जुन्या सिद्धांतानुसार गायीच्या दुधाचा संबंध टाईप 1 मधुमेहाशी जोडण्यात आलाय. मात्र,नंतर झालेल्या काही अभ्यासांनी हा सिद्धांत नाकारला आहे.
(रोज खा ‘हे’ पदार्थ;आयुष्यातला हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत)
त्यांच्यामते, पाश्चात्य देशांमध्ये,जन्मापासून नवजात मुलाला 6 महिन्यांपर्यंत आईचं स्तनपान केलं जात नाही. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती फारशी विकसित होत नाही आणि भविष्यात त्यांना आजारांशी लढताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं.
(काळ्या मिरीचा हा उपयोग माहिती झाला की, हेअर डाय वापरणं सोडून द्याल)
चेन्नई अर्बन रूरल एपिडेमियोलॉजिकल स्टडीने (CURES) दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सुरक्षित असल्याचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, गायीचं दुध प्यायल्याने मधुमेहावर संरक्षणात्मक परिणाम होतो. 5 खंडातील 21 देशांमधील 150,000 व्यक्तींवर हे संशोधन करण्यात आलं. ज्यामध्ये भारताच्या 5 भागांचाही समावेश होता. या अहवालाच्यामते, गायीच्या दुधामुळे डायबेटिज आणि हाय ब्लड प्रेशर यासारखे आजार होतात याचा कोणताही पुरावा मिळालेलं नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diabetes, Health Tips