फॅशन आणि मेकअपचा ट्रेन्ड नेहमीच बदलत असतो. हेअरकट हेअर स्टाईल, मेकअप, आय मेकअप, थ्री डी मेकअप आणि नेलआर्ट अशा अनेक फॅशन आल्यात.
2/ 8
लिपस्टिक किंवा डोळ्यांचा मेकअप यात तर, दरवेळी काही नवे बदल येत असतात. वेगवेगळ्या लिपस्टीक, अगदी काळ्या रंगाची लिपस्टीकही फॅशन म्हणून वापरात आली आहे.
3/ 8
पण, आता जरा जास्त चर्चेत आलेला ट्रन्ड म्हणजे लीप आर्ट. काही वर्षांपूर्वी नेलआर्ट ट्रेन्डमध्ये आला आणि सर्वांना आवडलाही. बोटांवर नेलपेंट लावून त्यावर डिझाईन, डायमंड लावून सुंदर कलाकुसर केली जायची.
4/ 8
आता मात्र, लीप पेंट हा प्रकार आलेला आहे. पेंट वापरून ओठांवर वेगवेगळ्या डिझाईन बनवल्या जातात. यासाठी कुंदन, स्टोन, ग्लिटरही वापरलं जातं.
5/ 8
लीप आर्टसाठी सर्वातआधी ओठांवर मेन कलर लावला जातो. त्यावर छोट्या ब्रशने, लायनर ब्रशने किंवा टुथपिकने छान डिझाईन काढल्या जातात.
6/ 8
हल्ली एखादी पार्टी, आऊटींग किंवा बीचवर जाताना थिमनुसार मुली लीप आर्ट करून घेतात. असे लीप आर्ट 8 ते 10 तास राहतात. मात्र काहीही खाताना किंवा पिताना काळजी घ्यावीच लागते.
7/ 8
यासाठी हजारो डिझाईन्स उपलब्ध आहेत. बीचसाठी ओशन थीम, आऊटींगसाठी पानं, फुलं,पक्षी. डेटवर जाताना बदाम गुलाबाची फुलं काढली जातात.
8/ 8
रात्रीच्या पार्टीसाठी ग्लिटर्स, रिसेप्शनसाठी कुंदन किंवा मोती असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे इथून पुढे तुमची मैत्रीण ओठांवर एखादी डिझाईन करुन आली तर, दचकू नका! कारण, हा नवा ट्रेन्ड आहे