Red Sandalwood Benefits : मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या 'या' समस्याही होतील दूर
Red Sandalwood Benefits : मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या 'या' समस्याही होतील दूर
मधुमेहींसाठी 'लालचंदन' (Red Sandalwood) खूप फायदेशीर असते. याला 'रक्तचंदन' किंवा वैज्ञानिक भाषेत 'टेरोकार्पस सँटालिनस' (Pterocarpus Santalinus) म्हणतात. जाणून घेऊया या लाल चंदनाच्या लाकडाचा मधुमेहासोबत इतर कोणत्या समस्यांवर कसा फायदा होतो याविषयी.
मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील अनेकांना मधुमेहाचा त्रास सुरू होतो. मधुमेह हा एक असा आजार आहे जो एकदा झाला तर आयुष्यभर साथ सोडत नाही. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे (Blood Sugar Level) खूप गरजेचे असते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांचे आरोग्याची काळजी घेणे सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका नेहमीच असतो. अशावेळी तुम्ही 'लालचंदना'च्या (Red Sandalwood) लाकडाचा वापर करू शकता. याला 'रक्तचंदन' किंवा वैज्ञानिक भाषेत 'टेरोकार्पस सँटालिनस' (Pterocarpus Santalinus) म्हटले जाते. जाणून घेऊया या लाल चंदनाच्या लाकडाचा मधुमेहासोबत इतर कोणत्या समस्यांवर कसा फायदा होतो याविषयी.
मधुमेहावर प्रभावी ठरते लाल चंदन
'झी न्यूज हिंदी'च्या बातमीनुसार लाल चंदनामध्ये असलेले सक्रिय घटक (Active Ingredient) शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी या लाकडापासून बनवलेल्या ग्लासात किंवा इतर भांड्यात रात्रभर पाणी ठेवावे आणि सकाळी ते प्यावे. या गुणांमुळेच अनेक घरांमध्ये लाल चंदनापासून बनवलेल्या ग्लासचा पारंपारिकपणे वापर केला जातो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पाणी खूप उपययुक्त ठरू शकते. मधुमेहासोबत लाल चंदनाचे लाकूड इतर काही समस्यांवर देखील उपयुक्त ठरू शकते.
या त्वचेच्या समस्याही होतील दूरस्किन पिग्मेंटेशन बरे होते : चेहऱ्यावर पिग्मेंटेशन असेल तर तुमच्या सौंदर्यात अडचण येऊ शकते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही लाल चंदनाचा वापर करू शकता. लाल चंदनामुळे पिग्मेंटेशनची समस्या दूर होऊ शकते. यासाठी घरीच फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्याला लावा. याशिवाय तुम्ही ज्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये रक्तचंदनाचा अर्क मिसळला आहे तेही वापरू शकता.
पिंपल्स होतील दूर : अनेकांना चेहऱ्यावर मुरुम होण्याची समस्या असते. कालांतराने त्यांचे रुपांतर काळ्या डागात होते अशा स्थितीत तुम्ही लाल चंदनाचा वापर करून या समस्येला मुळापासून दूर करू शकता. यासाठी एक चमचा लाल चंदन पावडर, चिमूटभर कापूर आणि एक चमचा हळद गुलाब जलमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भागावर लावा. त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा उपाय नियमित केल्याने पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते.
Published by:Pooja Jagtap
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.