मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? वेळ निघून जाण्यापूर्वी व्हा सावध!

हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? वेळ निघून जाण्यापूर्वी व्हा सावध!

बरेच जण अनेक तास कानांतून हेडफोन (Headphone) काढतच नाहीत. तुम्हाला देखील ही सवय असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

बरेच जण अनेक तास कानांतून हेडफोन (Headphone) काढतच नाहीत. तुम्हाला देखील ही सवय असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

बरेच जण अनेक तास कानांतून हेडफोन (Headphone) काढतच नाहीत. तुम्हाला देखील ही सवय असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.

    मुंबई, 6 जुलै : मेट्रो, बस, रेल्वेत किंवा विमानातही (Aeroplane) कानांत हेडफोन लावून संगीत ऐकणाऱ्या व्यक्ती सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. बरेच जण तर अनेक तास कानांतून हेडफोन (Headphone) काढतच नाहीत. तुम्हाला देखील ही सवय असेल तर वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. कारण, ही सवय तुमच्या कानांसाठी धोकादायक ठरू शकते. तासन् तास मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने कमी ऐकू येण्याची (Hearing Loss) समस्या निर्माण होऊ शकते. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात जास्त वेळ हेडफोन वापरण्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगण्यात आले आहे. फ्रान्समध्ये हेडफोन वापरणाऱ्या अनेकांना बहिरेपणा आल्याचं फ्रान्सच्याच नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्चच्या (INSERM) अभ्यासातून समोर आलं आहे. हेडफोनच्या अतिवापरामुळे फ्रान्समध्ये 25 टक्के ज्येष्ठ नागरिकांना बहिरेपणाची समस्या निर्माण झाली आहे. हेडफोनसह बिघडलेली जीवनशैली आणि नैराश्य हे देखील बहिरेपणाला कारणीभूत असल्याचे अभ्यासात म्हटलं आहे. अभ्यासामध्ये 18 ते 75 वर्ष वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, (WHO- World Health Organisation) जगभरात जवळपास 150 कोटी नागरिक ऐकू न येण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. सन 2050 पर्यंत हा आकडा 250 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठा आवाज ऐकणं धोकादायक हेडफोन किंवा इअरफोनमुळे उद्भवणाऱ्या समस्येबद्दल बोलताना कान-नाक-घसा तज्ज्ञ (ENT Specialist) डॉ. शरद मोहन (एमएस) म्हणाले की, हेडफोन किंवा इअरफोनमधून 85 डेसिबल (Decibel) आवाजात गाणी ऐकल्यामुळे नॉइज इंड्युस्ड हिअरिंग लॉस (NIHL) हा आजार होऊ शकतो. तसंच मोठ्या आवाजात दीर्घकाळ गाणी किंवा इतर आवाज ऐकत राहिल्यास अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. या सर्व गोष्टींकडं दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींना बहिरेपणा येण्याची शक्यता असते. काही सावधगिरी बाळगून या समस्येपासून दूर राहता येऊ शकतं. वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर काय सावधगिरी हवी? आवाजाच्या गोंगाटामुळे येणाऱ्या बहिरेपणाला पूर्णपणे रोखता येणं शक्य असल्याचं डॉ. शरद मोहन सांगतात. हेडफोनचा कमीतकमी वापर करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. गाणी ऐकताना आवाज खूप कमी ठेवावा. ज्या ठिकाणी गोंगाट जास्त आहे तिथे गोंगाट थांबवण्याचा प्रयत्न करावा. तसं न झाल्यास स्वत: त्यापासून दूर जावं. ऐकण्याच्या बाबतीत काही समस्या वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान, एकटेपणात किंवा लांबच्या प्रवासामध्ये अनेकदा वेळ निघत नाही म्हणून मोबाइलला हेडफोन कनेक्ट करून पॉडकास्ट, गाणी ऐकणं किंवा सिनेमे पाहिले जातात. परंतु आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कमी आवाजात व वेळ मर्यादित ठेऊन हेडफोनचा वापर करावा किंवा एखादं पुस्तक सोबत ठेऊन वाचन करणं कधीही चांगलं असल्याचं डॉक्टर सांगतात.
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या