मुंबई, 4 ऑक्टोबर : शारदीय नवरात्रौत्सवाचे उपवास अनेक जण करतात. या उपवासाला खाण्यासाठी तुम्ही कधीही टेस्ट न केलेल्या पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही केळीचे वेपर्स, केळीची भाजी याबद्दल ऐकलं असेल पण केळीपासून भजी सुद्धा बनवता येते. हे तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही रेसिपी बनवल्याची माहिती संहिता कांड यांनी दिली आहे. एका हटके पाककला स्पर्धेत ही रेसिपी सादर केल्यामुळे त्यांना विदेश वारीची संधी सुद्धा मिळाली. चला तर मग त्यांच्याचकडून ही रेसिपी शिकूयात. केळीची भजी बनवण्यासाठीचे साहित्य कच्ची केळी, भगर पीठ, राजगिरापीठ, आरारोट, जिरेपूड, शेंगदाण्याचा कूट, मीठ, कोथिंबीर , मिरची ,आलं, पाणी, तेल , गोड चटणी बनवण्यासाठी खजूर, कोकम आणि गूळ केळीची भजी करण्याची कृती कच्या केळ्याचे उभे किंवा गोल काप करावे. हे काप 15 मिनिटं मीठ लावून ठेवावेत. त्यानंतर अरारूटीची पेज बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी आणि अरारोट एकत्र करावे. त्यानंतर एका दुसऱ्या बाउल मध्ये भगरपीठ, राजगिरापीठ, चवीनुसार मीठ , जिरेपूड, कोथिंबीर, मिरची आणि आलं पेस्ट, शेंगदाण्याचा कूट एकत्र करून कोरडे पीठ बनवा. उपवासासाठी बनवा थालीपीठ, पाहा सोपी रेसिपी VIDEO कढईत मध्यम आचेवर तेल तापवत ठेवा. त्यानंतर केळ्याचे कापलेले काप अरारोटच्या स्लरीमध्ये बुडवून ते तयार केलेल्या भगर आणि राजगिराच्या कोरड्या पिठात घोळवून घ्यावे आणि तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे. गोड चटणी कशी बनवावी? गोड चटणी बनवण्यासाठी खजुर, कोकम आगळ आणि गूळ एकत्र करून शिजवणे तसेच आलं, मिरची आणि कोथिंबिरची मिक्सर मध्ये पेस्ट करून तिखट चटणी बनवून त्याबरोबर हे कुरकुरीत तळलेले कच्या केळ्याचे काप खावे. नवरात्रीमध्ये देवीला दाखवा चंपाकळीचा खास नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी VIDEO काय काळजी घ्याल? कोरड्या पिठात कोणतेही पाणी ओतू नये , किंवा अरारोट त्या कोरड्या पिठात टाकून पाणी टाकू नये ती स्लरी वेगळी बनवावी अन्यथा स्ट्रिप्स मऊ होण्याची शक्यता आहे. उपवासाला ही नवीन प्रकारची केळीजी भजी तुम्ही नक्कीच बनवू शकता. ही गरमागरम आणि कुरकुरीत भजी खाल्ल्यानंतर तुमचा उपवासाचा थकवा नक्की दूर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







