मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Navratri Recipe : नवरात्रीमध्ये उपवासासाठी बनवा थालीपीठ, पाहा सोपी रेसिपी VIDEO

Navratri Recipe : नवरात्रीमध्ये उपवासासाठी बनवा थालीपीठ, पाहा सोपी रेसिपी VIDEO

Navratri Recipe : नवरात्रीमध्ये उपवासासाठी थालीपीठ कसे बनवायचे याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 सप्टेंबर : आजपासून नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीत 9 दिवस उपवास करून देवीची आराधना केली जाते. पण 9 दिवस उपवास करत असताना खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक वेगळा पदार्थ खास उपवासाठी सांगणार आहोत त्याचे नाव आहे थालीपीठ. ही थालीपीठ रेसिपी कशी बनवायची याचीच सोपी पद्धत अनुराधा देव यांनी सांगितली आहे.

थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उपवासाची भाजणी - एक वाटी

चटणी - चवीनुसार

मीठ - चवीनुसार

शेंगदाणा कुट - गरजेनुसार

मिरची - कोथिंबीर

दही - दोन चमचे

उकडलेला बटाटा आणि पाणी

हेही वाचा : Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीला दाखवा चंपाकळीचा खास नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी VIDEO

थालीपीठ बनवण्याची कृती

सर्वप्रथम उपवासाची भाजणी घ्यावी त्यात चवीनुसार चटणी, मीठ, शेंगदाण्याचे कुट, मिरची, कोथिंबीर, दोन चमचे दही मिसळावे. त्यानंतर उकडलेला बटाटा कुस्करून भाजणीत मळून घ्यावा. गरजेनुसार त्यात पाणी घालून भाजणीचा गोळा तयार करावा. त्या भिजलेल्या भाजणीचे लहान लहान गोळे बनवावेत. पुढे तव्याला तूप लावून लहान गोळा तत्वावर पातळ पसरवून त्याला लहान लहान छिद्र बनवावीत. आता मध्यम फ्लेमवर तवा ठेवावा. लहान लहान छिद्रामध्ये तूप टाकावे व थालीपीठच्या आजूबाजूने सुद्धा तूप टाकून त्याला फ्राय करावे. सोनेरी रंग आल्यावर बाजू पलटून पुन्हा त्यात तूप टाकावे आणि सोनेरी रंग आल्यावर हे थालीपीठ तव्यावरून काढून घ्यावे.

हेही वाचा : Navratri : नवरात्राच्या पहिल्या दिवशी पाहा सप्तश्रृंगी देवीचं मूळ मनोहर रूप! Video

हिरवी चटणी कशी बनवणार?

साहित्य - जिरे- 1चमचा

चिरलेली कोथिंबीर- अर्धी वाटी

मिरची -1 किंवा 2

मीठ - चवीनुसार

जिरे, कोथिंबीर, मिरची एकत्र वाटून त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि त्याला एकत्रित करावे. या प्रकारे थालीपीठ सोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनेल. अश्या सोप्या पद्धतीने खमंग थालीपीठ करून तुम्ही चटणी सोबत नवरात्रीच्या उपवासाला खाऊ शकता.

First published:

Tags: Food, Mumbai, Navratri