मुंबई, 24 सप्टेंबर : चविष्ट पदार्थ खायला तर सर्वानाच आवडतात. मात्र बनवायला प्रत्येकालाच जमते असे नाही. स्वयंपाक करणे तितकेही अवघड नाही. थोडा प्रयत्न केलात तर तुम्ही अगदी स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. 25 सप्टेंबर नॅशनल कुकिंग डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही सोप्या सोप्या युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्याही स्वयंपाकाला अगदी रेस्टोरेंटचा फील येईल. कधी कधी सराईत स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या पदार्थालाही चांगली चव येत नाही. मात्र कधी कधी अगदी नवख्या माणसाच्या हातच्या स्वयंपाकालाही खूप चव येते. हा सगळा खेळ केवळ काही युक्त्यांचा असतो. स्वयंपाकात काही किरकोळ बदल करून हे सर्व साध्य करता येते. पद्धतीत थोडासा बदल केल्याने चवीत लक्षणीय बदल होऊ शकतो.
Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीला दाखवा चंपाकळीचा खास नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी VIDEOहॉटेल स्टाईल चवीसाठी फॉलो करा या टिप्स - पराठे अनेक घरांमध्ये बनवले जातात. चविष्ट पराठा बनवताना उकडलेले बटाटे किसून घ्या आणि मिक्स करा. यामध्ये युक्ती ही आहे की पराठे भाजताना त्याला तूप किंवा तेल लावण्याऐवजी बटर लावा. पराठ्यांवर बॅटरीची चव खूप छान लागते. - भजी खायला जवळपास सर्वानाच आवडते. मात्र भजी कुरकुरीत हवी. भजी अधिक कुरकुरीत आणि चविष्ट बनवण्यासाठी भज्यांच्या पिठात थोडे गरम तेल आणि 1 चिमूट अॅरोरूट घाला. आणि भजी सर्व्ह करताना त्यावर चाट मसाला घाला आणि टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. - अनेकदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही बनवून पाहतो. मात्र कधी कधी ग्रेव्हीला घट्टपणा येत नाही. ग्रेव्ही थोडी घट्ट करण्यासाठी त्यात थोडे सत्तूचे पीठ घाला. यामुळे ग्रेव्ही घट्ट तर होईलच त्याचसोबत ती चविष्ट आणि पौष्टिकही होईल.
- बऱ्याच लोकांना चायनीज खायला खूप आवडते. मात्र घरी न्युडल्स बनवताना ते हमखास एकमेकांना चिकटतात. अशावेळी नूडल्स उकळताना पाण्यात थोडे तेल आणि मीठ घाला. न्युडल्स थोडे उकळल्यानंतर ते काही सेकंदांसाठी थंड पाण्यात ठेवा. - घरी पार्टी असेल किंवा अनेकजण जेवायला येणार असतील. तर आपण सोपी आणि कमी वेळेत होणारी पुरी भाजी करतो. पण या पुरी भाजीला मजा तेव्हा येते. जेव्हा पुरी अगदी कुरकुरीत बनते. याची सुद्धा एक ट्रेक आहे. पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा तांदळाचे पीठ किंवा रवा घालून चांगले मिक्स करा. यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील.
सावधान! पनीर पौष्टिक; पण काही जणांसाठी ठरू शकतं हानिकारक…- भात बनवणं हे स्वयंमापकातील सर्वात सोपं काम आहे. मात्र हेच सोपं काम एक ट्रेक वापरून केलं तर त्या साध्या भातालाही खूप चव येते. यासाठी पाण्यात तांदूळ उकळताना त्यात थोडा लिंबाचा रस टाका. यामुळे भात अधिक फुलेल, पांढरा शुभ्र दिसेल आणि चवदार होईल.