Home /News /lifestyle /

Methi Laddu Recipe : गोड लाडू खाऊनही वजन वाढणार नाही तर उलट कमी होईल; फक्त अशा पद्धतीने बनवा

Methi Laddu Recipe : गोड लाडू खाऊनही वजन वाढणार नाही तर उलट कमी होईल; फक्त अशा पद्धतीने बनवा

तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर लाडू तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.

  मुंबई, 21 जुलै : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकजण बाहेरचं अन्न खातात. काही वेळा घरी जेवण न बनल्यामुळे बाहेरून जेवण ऑर्डर केले जाते. तर काहीवेळा वेळेअभावी लोक जेवणाऐवजी फास्ट फूडवर आपली भूक भागवतात. परंतु या सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते आणि शरीराचा आकार बिघडू लागतो. अशा स्थितीत वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. परंतु लाडूचे शौकीन असलेले लोक आपलं वजन अगदी सोप्या पद्धतीने कमी करू शकतात. वजन नियंत्रित करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मेथीच्या लाडूचे फायदे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया मेथीचे लाडू वजन कमी करण्यासाठी कसे फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर मेदीचे लाडू तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. मेथीची चव कडू असते परंतु आज आम्ही तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला हे कडू लागणार नाहीत आणि तुम्ही हे लाडू आवडीने खाऊ शकाल. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्री मेथी भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खातात. परंतु मेथीच्या कडवट चवीमुळे सर्वांना असे करणे शक्य होत नाही. परंतु आता तुम्ही मेथीचे लाडू खाऊन वजन कमी करू शकता.

  Skin Care : चेहऱ्यावर दिसतायत फाईन लाईन्स आणि सुरकुत्या? आवळ्याच्या मदतीने अशी घ्या त्वचेची काळजी

  लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य  मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथी, गूळ, साखर, गव्हाचे पीठ, दूध आणि काही ड्रायफ्रुट्स हे साहित्य लागते. या लाडूची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात सुंठ, वेलची, दालचिनी आणि जायफळ देखील घालू शकता.

  Travel Tips : मोकळ्या मनानं घ्या ट्रिपचा आनंद, कंटाळवाणा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी टिप्स

  लाडू बनवण्याची पद्धत हे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथ्या भिजवून वाळू घाला. नंतर त्या बारीक वाटून घ्या. त्यात ड्रायफ्रुट्स, जायफळ, वेलची घालून बारिक करा. दुसरीकडे कढईत तूप गरम करून ते मिश्रण चांगले उकळून घ्या आणि आता चूर्ण साहित्यही गरम करा. तुम्ही त्यात गूळ किंवा साखर देखील घालू शकता. तसेच कोमट दूध घालू शकता. मिश्रण चांगले उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि लाडू वळवायला घ्या. दोन्ही हातांनी गोल गोल फिरवून लाडू बांधा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी हे लाडू खा. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Recipie

  पुढील बातम्या