जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Travel Tips : मोकळ्या मनानं घ्या ट्रिपचा आनंद, कंटाळवाणा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी टिप्स

Travel Tips : मोकळ्या मनानं घ्या ट्रिपचा आनंद, कंटाळवाणा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी टिप्स

Travel Tips : मोकळ्या मनानं घ्या ट्रिपचा आनंद, कंटाळवाणा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी टिप्स

जग फिरल्यामुळे जग अधिक कळतं. प्रवासात आलेले बरे-वाईट अनुभव (Travelling Experiences) माणसाला समृद्ध करतात. मात्र काही लोकांची स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायची तयारी नसते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 20 जुलै : जग फिरल्यामुळे जग अधिक कळतं. प्रवासात आलेले बरे-वाईट अनुभव (Travelling Experiences) माणसाला समृद्ध करतात. मात्र काही लोकांची स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायची तयारी नसते. अशांना प्रवास करणं अजिबात आवडत नाही. पण कधीतरी स्वतःसोबतच इतरांसाठीदेखील प्रवास करावा लागतो. त्यावेळी प्रवासाला कंटाळवाणं काम न समजता त्याचा आनंद घेण्याची मानसिकता ठेवायला हवी. त्यासाठी काही सोप्या गोष्टी मदतनीस म्हणून उपयोगी ठरतील. काही जणांना फिरायला आवडतं. त्यांच्यासाठी प्रवास ही एक सुंदर गोष्ट असते. मात्र ज्यांना फिरणं आवडत नाही, त्यांना हा प्रवास कंटाळवाणा वाटतो. त्यांनी प्रवासाची मजा लुटण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. सकाळी प्रवास सुरु करा सकाळी गर्दी कमी असते. त्यामुळे प्रवासाची सुरुवात सकाळीच करा. सकाळी वातावरण छान असतं. निसर्गही सुंदर दिसतो. त्यामुळे फोटो वगैरे काढणं सोपं होतं. स्थानिक लोकांसोबत चर्चा करून सकाळीच प्रवासाला निघणं फायदेशीर ठरू शकतं. धीर धरा एखाद्या ट्रिपला जाताना सगळं ठरवल्यानुसार घडतच असं नाही. काही अडचणी येऊ शकतात. अशावेळी आरडाओरडा, वादविवाद न करता शांतपणानं समस्या सोडवा. काही गोष्टींसाठी धीर धरणं (Be Patient) आवश्यक असतं. सतत नाराजीचा सूर राहिला, तर पिकनिकची मजा निघून जाते. गडबड करू नका रोजच्या आयुष्यातून वेगळेपणा मिळावा, यासाठी ट्रिप्स आयोजित केल्या जातात. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यापेक्षा वेगळं वर्तन तिथे अपेक्षित असतं. एखादं ठिकाण पाहताना घाई, गडबड न करता व्यवस्थित शांतपणे त्याचा आनंद घ्या. कम्फर्ट झोनमधून बाहेर या ट्रिपला गेल्यावर रूटीनपेक्षा वेगळ्या गोष्टी करण्यातला आनंद घ्या. काही ठिकाणी पुन्हापुन्हा जाणं होतच असं नाही. त्यामुळे तिथे असलेल्या गोष्टी पुरेपूर पाहा, अनुभवा. कम्फर्ट झोनमधून (Comfort Zone ) बाहेर आल्यामुळे तुम्ही ट्रिप एन्जॉय करू शकाल. छोट्याछोट्या गोष्टींनी निराश होऊ नका. कोणतीच गोष्ट अशक्य नसते. मनाची साद ऐका आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. मोकळ्या मनानं ट्रिप करा दुसऱ्यांच्या जीवनशैलीशी तुलना न करता प्रवासाची मजा अनुभवा. ज्या ठिकाणी जाल, तिथले स्थानिक खाद्यपदार्थ खा, कपडे घालून बघा, संस्कृती अनुभवा. इतरांकडे पूर्वग्रहित दृष्टिकोनातून पाहू नका. खुल्या मनानं (Open Mind) ट्रिपचा आनंद घ्या. वर्षातून एकदा किंवा दोनदा ट्रिपला जाणाऱ्यांना त्याचा आनंद घेणं काहीवेळा अवघड जातं. ट्रिपचं नियोजन, वेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे येणाऱ्या अडचणी, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडताना होणारा त्रास यामुळे तुम्हाला ट्रिप कंटाळवाणी वाटू शकते. त्यासाठी खुल्या मनानं, अनुभव घेण्याच्या मानसिकतेनं ट्रिप एन्जॉय करा. म्हणजे ती ट्रिप आठवणीत राहील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात