जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali Faral Recipe : दिवाळीचा फराळ बनवणं अवघड वाटतं? पाहा या सोप्या रेसिपी, सहज होईल काम

Diwali Faral Recipe : दिवाळीचा फराळ बनवणं अवघड वाटतं? पाहा या सोप्या रेसिपी, सहज होईल काम

Diwali Faral Recipe : दिवाळीचा फराळ बनवणं अवघड वाटतं? पाहा या सोप्या रेसिपी, सहज होईल काम

फराळ बनवताना घाई गडबड तर होतेच. मात्र काही लोकांना फराळाचे पदार्थ विशेष बनवता येत नाही. अशावेळी तुम्हाला काही युक्त्या आणि एक परफेक्ट रेसिपी हवी असते ज्याद्वारे तुम्ही फराळाचे पदार्थ न बिघडवता तयार करू शकाल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 ऑक्टोबर : सणासुदीला फराळ करायचा म्हणलं की आपली खूपच धांदल उडते. त्यातही जॉब करणाऱ्या स्त्रिया असल्या तर त्यांना फराळ बनवायला एक किंवा दोन दिवस फारतर सुट्टी मिळते. फराळ बनवताना घाई गडबड तर होतेच. मात्र काही लोकांना फराळाचे पदार्थ विशेष बनवता येत नाही. अशावेळी तुम्हाला काही युक्त्या आणि एक परफेक्ट रेसिपी हवी असते ज्याद्वारे तुम्ही फराळाचे पदार्थ न बिघडवता तयार करू शकाल. युट्युबवर रुचकर मेजवानी या या चॅनेलवर सोप्या रेसिपी देण्यात आलेल्या आहेत.

Diwali 2022 : झटपट दिवाळीचा फराळही होईल आणि सणाला तुमचा वेळही वाचेल, फक्त करा ही पूर्वतयारी

साठ्याची करंजी करंजीच्या सारणासाठी एक वाटी बारीक रवा घ्या आणि तो तूपमध्ये छान भाजा. नंतर त्यात ड्राय फ्रुट्स, खसखस आणि एक वाटी सुकं खोबरं घ्या. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात मनुके, चवीप्रमाणे वेलची पावडर आणि एक वाटी पिठी साखर घाला. पारीसाठी तूप गरम करून घ्या. आता एका बाऊलमध्ये पाव किलो मैदा, थोडं मीठ घ्या आणि त्यात गरम केलेलं तूप घाला. नंतर यात थोडं थोडं पाणी घालून त्याची कणिक मळून घ्या. हे पीठ तयार झाल्यावर लगेच याचे गोळे करून लाटायला घ्या. याच्या चपात्या लाटून घ्या ना पातळ ना जाड अश्या चपात्या लाटा.

News18लोकमत
News18लोकमत

आता साठा घ्या, साठा म्हणजे तूप किंवा डालडा घेऊन त्याला पांढरा होईपर्यंत फेटून घ्या. हा साठा चपातीला लावा. त्यानंतर दुसरी पोळीला त्यावर लावा. त्यावर पुन्हा साठा लावून तिसरी पोळी लावा. नंतर ही पोळी लाटून घ्या. त्यानंतर वरच्या पोळीलाही साठा लावा आणि त्याचा रोल तयार करा. त्यानंतर सुरीने याचे छोटे छोटे पिसेस तयार करा आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये सारण भरून करंजीप्रमाणे दुमडून घ्या. अशाप्रकारे सर्व करंज्या तयार करून घ्या. आता करंज्या दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्या. चकल्या चकल्या बनवण्यासाठी पाव किलो तांदूळ धुवून सुकवून घ्याचा, त्यासोबत पोहे, साबुदाणा, पोहे, चणा डाळ, उडद डाळ, धने, दालचिनी, जिरे, काळी मिरी लवंगा त्यानंतर हे सर्व जिन्नस भाजून घ्या आणि दळून घ्या. चकलीची भाजणी तयार आहे. कढईत एक वाटी पाणी घ्या त्यात लाल तिखट, हळद पावडर, तेल, चवीप्रमाणे मीठ, तीळ टाका. हे पाणी उकळून घ्या आणि नंतर खाली उतरवून त्यात एक वाटी भजनी घाला. नंतर हे व्यवस्थित मिक्स करा. ५-१० मिनिटांनी हे पीठ मळून घ्या. यात पाणी लागते की नाही ते पाहा. पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर ते चकलीच्या साच्यात भरून त्याच्या चकल्या पाडून घ्या. तुम्ही थेट तेलामध्येही चकल्या पाडू शकता किंवा पेपरवर चकल्या पाडून घ्या आणि नंतर तेलामध्ये तळा. चकल्या जास्त न हलवता लालसर रंगावर तळून घ्या.

Diwali 2022 : दिवाळीला कमी खर्चात घराची करा सुंदर सजावट, या आहेत काही सोप्या डेकोरेशन आयडिया

पोह्याचा चिवडा पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी पोहे मंद गॅसवर छान भाजून घ्या. त्यानंतर कढईत तेल घ्या. त्यात शेंगदाणे, सुकं खोबरं, दाळवं हे एकानंतर एक तळून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि तेलामध्ये फोडणीसाठी धने, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, हळद घालून तळून घ्या आणि नंतर ती फोडणी पोह्यांमधे घाला. यानंतर त्यात थोडी साखर आणि मीठ घालून हळुवार एकत्र करून घ्या. अशाप्रकारे तुमचा पोह्यांचा चिवडा तयार आहे. बेसन लाडू बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी एका कढईत एक वाटी तूप ग तूप विटाळल्यावर बेसन घालून ते छान भाजून. बेसन भाजून झाल्यानंतर त्यात अर्धा कप दूध टाळा. त्यानंतर गॅस बंद करून हलवा. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात अडीच वाट्या पिठी साखर आणि थोडी वेलची पूड घालून लाडू बांधून घ्या.

काजू कतली पावकप पाणी आणि त्यात अर्धा कप साखर घाला. त्याचा एकतारी पाक तयार करून घ्या. पाक तयार झाल्यानंतर त्यात एक कप काजू पावडर घाला. हे मिश्रण हलवत राहा आणि थोडा वेळ झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर याचे गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून घ्या. यानंतर त्यावर वर्ख लावून काजू कतली कापून घ्या.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात