जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali 2022 : झटपट दिवाळीचा फराळही होईल आणि सणाला तुमचा वेळही वाचेल, फक्त करा ही पूर्वतयारी

Diwali 2022 : झटपट दिवाळीचा फराळही होईल आणि सणाला तुमचा वेळही वाचेल, फक्त करा ही पूर्वतयारी

Diwali 2022 : झटपट दिवाळीचा फराळही होईल आणि सणाला तुमचा वेळही वाचेल, फक्त करा ही पूर्वतयारी

तेवढ्यात दिवाळीचा सर्व फराळ बनवायचा म्हंटल की, खूप घाई गडबड होते. त्यात आपण खूपच थकून जातो. किंवा कधी कधी आपले पदार्थ बिघडतात. मात्र ही सगळी गडबड आणि त्रास तुम्ही रोखू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 11 ऑक्टोबर : सणासुदीला फराळ करायचा म्हणलं की आपली खूपच धांदल उडते. त्यातही जॉब करणाऱ्या स्त्रिया असल्या तर त्यांना फराळ बनवायला एक किंवा दोन दिवस फारतर सुट्टी मिळते. मग तेवढ्यात दिवाळी चा सर्व फराळ बनवायचा म्हंटल की, खूप घाई गडबड होते. त्यात आपण खूपच थकून जातो. किंवा कधी कधी आपले पदार्थ बिघडतात. मात्र ही सगळी गडबड आणि त्रास तुम्ही रोखू शकता. फराळ बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही खूप कमी वेळेत फराळ बनवू शकता. दिवाळीपूर्वी जशी आपण घराची साफसफाई करतो. घराच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य आधीच आणून ठेवतो. त्याचप्रमाणे दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी तुम्ही काही दिवस अगोदरपासून रोज थोडी थोडी तयारी केलीत तर तुमचा फराळ एका दिवशी अगदी सहज तयार होईल.

    Diwali 2022 : दिवाळीला कमी खर्चात घराची करा सुंदर सजावट, या आहेत काही सोप्या डेकोरेशन आयडिया

    फराळाच्या पदार्थांसाठी अशी करा पूर्व तयारी वेलची पूड तयार करून ठेवा दिवाळीचा फराळ बनवताना अनेक गोड पदार्थांमध्ये आणि पुराणपोळीमध्ये आपल्याला वेलची पूड लागते. त्यासाठी काही वेलची घेऊन त्या हलक्या गरम करा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तुम्ही त्यात साखरही घालू शकता.

    News18लोकमत
    News18लोकमत

    खोबऱ्याचा किस तयार करून ठेवणे फराळाच्या पदार्थांमध्ये करंजी, मोदक, साटोऱ्या असे पदार्थ बनवताना आपल्याला खोबऱ्याचा किस जास्त प्रमाणात लागतो. खोबऱ्याचा किस करत बसण्यात खूप वेळ जातो त्यामुळे खोबऱ्याचा किस तयार करून ठेवा. यासाठी खोबरं 10-15 ठेवा. यामुळे खोबरं किसायला सोपं होतं. पाण्यातून काढून खोबरं स्वच्छ कपड्याने छान पुसून घ्या आणि मग किसा. खोबरं बराच काळ टिकवून ठेवायचं असेल तर ते कढईत थोडा वेळ गरम करून घ्या. नंतर थंड करून डब्यामध्ये भरून ठेवा. सुक्या मेव्याचे काप फराळाच्या पदार्थांमध्ये आपल्याला सुक्या मेव्याचे कापही लागतात. यासाठी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून डब्यात भरून ठेवा. यामुळे पदार्थ बनवताना आपला खूप वेळ वाचतो. रवा भाजून ठेवा लाडू किंवा कारंजी अशा पदार्थांसाठी आपल्याला भाजलेला रवा लागतो. त्यामुळे आपल्याला ज्या प्रकारचा रवा लागतो, जसे की जाडा किंवा बारीक. तो तूप न घालता आधीच भाजून ठेवावा. रवा पूर्ण थंड झाल्यावर तो डब्यात भरून ठेवा. डेसिकेटेड कोकोनट कारंजी, मोदक किंवा असेच इन्स्टंट पदार्थ बनवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला डेसिकेटेड कोकोनट लागते. ते बाजारातून न आणता तुम्ही घरीही बनवून ठेऊ शकता. यासाठी ओले नारळ घ्या आणि ते करवंटीसह एका स्टीमर मध्ये घालून 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर ते बाहेर काढून थंड करून करून घ्या. थंड झाल्यानंतर हे नारळ करवंटीमधून बाहेर काढून मिक्सरमध्ये पल्स मोडवर थोडे बारीक करून घ्या. याला सलग फिरवू नका. 5-5 सेकंड फिरवा आणि बंद करा. त्यानंतर जाड तळाच्या कढईत कमी गॅसवर भाजून घ्या आणि हे व्यवस्थित कोरडे होऊ द्या. नंहतर थंड झाल्यावर डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

    Diwali 2022 : यंदा तेलाशिवाय पेटवा पणत्या, बाजारात आले पाण्यावर पेटणारे दिवे; पाहा PHOTOS

    यासर्वांबरोबरच तुम्ही खसखस देखील भाजून ठेऊ शकता. तसेच पिठी साखरही तयार करून ठेवा आणि गूळदेखील बारीक करून ठेऊ शकता. या सर्व टिप्समुळे सणाच्या काळात तुमचा खूप वेळ वाचेल आणि तुम्ही सर्व सण आनंदाने एन्जॉय करू शकाल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात