मुंबई, 29 डिसेंबर : जेव्हा तुम्ही अनेक लोकांच्यामध्ये असताना उचकी लागणं ही काहीवेळा काहीवेळा समस्या बनते. अशा परिस्थितीत जेव्हा उचकी सुरू होते तेव्हा सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतात. अशा स्थितीत लाज वाटणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी अशी मान्यता आहे की, कुणीतरी आपली आठवण काढल्यानंतर आपल्याला उचकी लागते. मात्र या गोष्टींमध्ये खरंच किती तथ्य आहे? खरंच कुणीतरी आठवण काढल्यावर आपल्याला उचकी लागते का? की यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? आज आपण या सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर उचकी थांबवण्यासाठी काही उपायही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Eggs Side Effects : हिवाळ्यात रोज 4-5 खाता? मग एकदा हे दुष्परिणाम नक्की वाचाउचकी का लागते? डायाफ्राम आणि पोट आणि फुफ्फुसाच्या दरम्यान असलेल्या बरगड्यांच्या स्नायूंचे आकुंचन हे उचकी येण्याचे मोठे कारण आहे. डायाफ्रामच्या आकुंचनामुळे फुफ्फुस वेगाने हवा आत घेते आणि यामुळे उचकी लागू शकते. त्याचबरोबर अन्न किंवा गॅसमुळे पोट भरलेले असेल तर त्यामुळेही उचकी लागू शकते. तसेच तापमानात अचानक बदल, वेगाने खाणे, कार्बोनेटेड पेये पिणे, मसालेदार अन्न खाणे, ताणतणाव, अल्कोहोलचे सेवन, जास्त किंवा कमी अन्न खाणे यामुळे कधीकधी उचकी लागू शकते. हे थांबवण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या वापरतात.
उचकी घालवण्यासाठी उपाय - किमान 5 वेळा तोंड बंद करून नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास कमीतकमी 10 ते 20 सेकंद धरून ठेवा. असे केल्याने उचकी थांबेल. - एक कागदी पिशवी घ्या आणि त्यावर आपले नाक आणि तोंड झाकून टाका. आता आतमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. प्लास्टिक पिशव्या वापरू नका. - खुर्चीवर बसा आणि पुढे वाकून आपल्या गुडघ्यांना घट्ट मिठी मारा. काही काळ या स्थितीत रहा. उचकी थांबेल. - वरच्या दिशेने पाहा आणि शक्य तितकी जीभ बाहेर काढा. - नाक घट्ट बंद करून पाणी प्या. - बर्फ घालून थंड पाणी प्या आणि हळू हळू प्या. मध्ये मध्ये याच पाण्याने गार्गल करा. - आईस क्यूब तोंडात ठेवा आणि टॉफीप्रमाणे चोखून घ्या. - एक चमचा मध आणि पीनट बटर तोंडात टाकून गिळावे. - कोमट पाण्याने गार्गल करा. - जिभेवर व्हिनेगरचे काही थेंब टाका, तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता. - वेलची घालून पाणी उकळून त्यात मीठ टाकून प्यावे. - आल्याचा तुकडा तोंडात ठेवा आणि चोखत रहा. उचकी काही वेळात थांबेल.
ड्राय फ्रुट मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टरांचे मत(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)