मुंबई, 29 डिसेंबर : उकडलेले अंडी किंवा ब्रेड ऑम्लेट हा केवळ परदेशातच नाही तर भारतातही बहुतांश लोकांचा आवडता नाश्ता बनला आहे. विशेषत: फिटनेस फ्रीक्स आणि वर्कआउट करणारे लोक ते प्रोटीनच्या स्वरूपात घेतात. अंडी खाणे हे आरोग्यदायी मानले जात असले तरी दररोज अंडी खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? आणि खाल्यास ते किती प्रमाणात खावे? अंडी हा प्रोटीनचा स्रोत आहे, पण त्यात कोलेस्टेरॉलही जास्त प्रमाणात आढळते. यामुळेच बहुतेक फिटनेस तज्ञ अंड्याचा पिवळा भाग काढून टाकून खाण्याचा सल्ला देतात. रोज अंडी खाणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? जाणून घेऊया. दररोज अंडी खाणे किती सुरक्षित आहे? अनेक अभ्यासानुसार, अंड्यांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल असते, ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता निर्माण होते. Health.com नुसार, एका अंड्यामध्ये सुमारे 186 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते, परंतु ते खाल्ल्याने शरीरात उच्च घनता असलेल्या लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी चांगले कोलेस्ट्रॉल मानले जाते. त्यामुळे असे म्हणता येईल की अंडे आरोग्यासाठी चांगले आहे, ते दररोज सेवन केले जाऊ शकते. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. एका मोठ्या अंड्यामध्ये 6.30 ग्रॅम प्रोटीन, 147 मिलीग्राम कोलीन, 0.53 मिलीग्राम व्हिटॅमिन ई, 2.05 ग्रॅम व्हिटॅमिन डी आणि फोलेट असते. ते शरीरात उपस्थित पेशी तयार करण्यात आणि दुरुस्त करण्यात मदत करू शकतात. त्याच वेळी व्हिटॅमिन ई आणि डी केस, त्वचा आणि हाडे मजबूत करण्याचे काम करतात. जास्त प्रमाणात अंडी खाल्याने काय त्रास होऊ शकतो अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्याने 6 ग्रॅम फॅट आणि सुमारे एक ग्रॅम प्रोटीन मिळतात. म्हणजेच एक संपूर्ण अंडे आपल्याला 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन आणि 6 ग्रॅम फॅट्स मिळतात. एका पिवळ्या भागामध्ये 95 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. निरोगी राहण्यासाठी एका दिवसात कोलेस्टेरॉलचे सेवन 200 मिलीग्रामच्या आत असावे. म्हणूनच रोज ५ अंडी खाल्ल्यास 475 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल मिळते, जे दैनंदिन सामान्य प्रमाणाच्या दुप्पट आहे. झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रोज 5 अंडी खाल्याने तुमच्या कोलेस्ट्रॉलची संख्या खूप वाढेल. यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजारही होऊ शकतात. ज्याचा प्रामुख्याने हृदयावर परिणाम होतो. म्हणूनच रोज ५ अंडी खात असाल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे अंडी प्रमाणातच खावी आणि रोज 2 ते 3 पेक्षा जास्त खाऊ नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.