जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ड्राय फ्रुट मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

ड्राय फ्रुट मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

ड्राय फ्रुट मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

मधुमेहाची समस्या असणाऱ्यांनी खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी. शुगरच्या रुग्णांनी ड्रायफ्रूट्स खावेत की नाही, याबाबत बहुतेकांच्या मनात संभ्रम असतो. यावर डॉक्टरांचे मत जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 डिसेंबर : हिवाळ्यात तंदुरुस्त आणि हेल्दी राहण्यासाठी लोकांनी ड्रायफ्रुट्स खावेत असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. काजू, बदाम, पिस्ता यांसारख्या गोष्टी खायला सर्वांनाच आवडतात. त्यामध्ये भरपूर पोषक असतात, ज्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. काही लोक मधुमेहा च्या रुग्णांना सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात, तर काही लोक ते हानिकारक मानतात. ड्रायफ्रुट्स आणि डायबिटीजबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहे. आज आपण मधुमेह तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की, सुक्या मेव्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे. हे कोणत्या वेळी खाणे फायदेशीर आहे हे देखील जाणून घेऊया.

Diabetes Tips : डायबिटीजमुळे पायांमध्ये होतात वेदना, या सवयीमध्ये आत्ताच करा बदल

ड्रायफ्रुट्स आणि डायबिटीजबद्दल डॉक्टरांचे मत डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य, वरिष्ठ सल्लागार, एंडोक्रोनॉलॉजी विभाग, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यप्रकाशात सुका मेवा वाळवून तयार केले जातात. यामुळे त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससह नैसर्गिक फ्रक्टोजचे प्रमाण वाढते. म्हणूनच सुक्या मेव्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मात्र ते ठराविक प्रमाणात खाल्यासच फायदेशीर आहे. अतिसेवनामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. सुका मेवा कॅलरींनी भरलेला असतो. जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर ग्लायसेमिक नियंत्रणावर नकारात्मक परिणाम होतो. 8-10 बदामाप्रमाणे सुमारे 70 कॅलरीज असतात. काजू, पिस्ता हे सर्व कॅलरींनी भरलेले असतात. जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढते. कोणत्या वेळी ड्रायफ्रूट्स खाणे अधिक फायदेशीर आहे? डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य म्हणतात की, मधुमेहाचे रुग्ण दिवसाच्या कोणत्याही वेळी ड्राय फ्रुट्स खाऊ शकतात, परंतु उर्जेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ते जेवणाच्या दरम्यान घेणे चांगले आहे. त्यामुळे सुक्या मेव्याचे सेवन करताना मधुमेही रुग्णांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांनी अन्नाप्रमाणे सुका मेवा खाऊ नये. त्यांचे सेवन मर्यादित करा आणि त्यांचा फायदा घ्या.

डायबिटिजसोबत अनेक त्रासांपासून मिळेल आराम, फक्त दुधात मिसळून प्या हा पदार्थ

जर एखाद्याची प्रकृती गंभीर असेल तर ड्रायफ्रुट्स खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला जाऊ शकतो. जर आपण निरोगी लोकांबद्दल बोललो तर त्यांना सुक्या मेव्याचा खूप फायदा होऊ शकतो. मात्र निरोगी लोकांनी देखील ड्राय फ्रूटचे अतिसेवन टाळावे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात