मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरेच्चा! इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग नेमकं प्रेम व्यक्त करतात तरी कसे?

अरेच्चा! इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग नेमकं प्रेम व्यक्त करतात तरी कसे?

आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुरक्षित वाटावं असं मुलींना वाटत. एखाद्या वाईट प्रसंगात मुलांना भांडण करण्यापेक्षा त्यांचा बचाव करावं असं त्यांना वाटतं

आपल्या जोडीदाराच्या सहवासात सुरक्षित वाटावं असं मुलींना वाटत. एखाद्या वाईट प्रसंगात मुलांना भांडण करण्यापेक्षा त्यांचा बचाव करावं असं त्यांना वाटतं

इथं लोक लवकर एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना साथ देण्यावर विश्वास ठेवतात.

पॅरिस, 22 जून: जगभरात प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केलं जातं. मात्र, एक वाक्य कॉमन असतं ते म्हणजे I Love You. प्रेम व्यक्त करण्यासाठी हे वाक्य कदाचित जगातील सर्वात सोपं आणि सगळीकडे सारखं असेल पण त्याला अपवाद आहे फ्रान्सचा. युरोपातल्या या सुंदर देशात लोक एकमेकांशी बोलून प्रेम व्यक्त करत नाहीत. फ्रेंच संस्कृतीत (French culture ) इतर अनेक मार्गांनी प्रेम व्यक्त केलं जातं. कमिटमेंट करणं आणि निभावणं - फ्रान्सचे नागरिक युरोपीय आणि पश्चिमी देशांच्या तुलनेत लवकर एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांना साथ देण्यावर विश्वास ठेवतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी ते काय करतात? एकमेकांना फूल किंवा चॉकलेट देणं, पार्टी करणं, संध्याकाळी सोबत वेळ घालवणं, विकेंडला फिरायला जाणं आणि चांगली दारू पितात हे कल्चर फ्रेंच कपल्समध्ये कॉमन असतं. मात्र ते प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘लव्ह यू’ फार कमी वेळा म्हणतात. यामागे अंद्धश्रद्धा किंवा कोणतीच मान्यता नाही. तर फ्रेंच भाषेत असलेला शब्दांचा अभाव हे कारण आहे. त्यांच्या भाषेत ‘लव्ह यू’ म्हणण्यासाठी कोणताच खास शब्द नाही. हे वाचा - औषधांना कंटाळलात? डायबेटिससाठी ‘हे’ घरगुती उपायही करून पहा आवड आणि प्रेमासाठी कॉमन शब्द - फ्रेंच भाषेतील ऐमे (aimer) हा शब्द आवडणं आणि प्रेम या दोन्ही भावनांसाठी कॉमन आहे. अशात एखाद्या फ्रेंच भाषिकाने एखाद्या पदार्थासाठी किंवा फुलासाठी हा शब्द वापरला तर थोडं वेगळं वाटू शकतं. त्यामुळे ऐमे हा शब्द कॉमन वापरला जातो मात्र, कपल्स एकमेकांसाठी फारच कमी वापरतात. प्रेमाशी संबंधित अनेक शब्द इंग्रजीत जोडले गेले - काही ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यासाठी फ्रेज (वाक्प्रचार) गरजेची आहे. जसं पहिल्या नजरेतील प्रेमासाठी इथं - coup de foudre म्हटलं जातं. किंवा माझ्या आयुष्यातील प्रेमासाठी homme ou femme de ma vie सारखे वाक्प्रचार वापरले जातात. ‘लव्ह यू’ सारख्या शब्दांचा अभाव असला तरी फ्रेंच भाषेला प्रेम आणि रोमांसची भाषा मानलं जातं. रोमांस आणि फ्लेटरी शब्द ओल्ड फ्रेंचपासून आले असून त्यांनी इंग्रजीत स्वतःसाठी जागा निर्माण केली. फ्रेंच लोकांचं वैशिष्ट्य – फ्रेंच लोक खाण्यापासून ते प्रेयसीपर्यंत सर्वांचं कौतुक इतकं सुंदर करतात की कोणीही प्रेमात पडेल. एखादी महिला जड वस्तू उचलून नेत असेल तर किंवा एखाद्याच्या मदतीला फ्रेंच माणसं धावून जातात. पाळीव प्राण्यांच्या नावाने संबोधणं - फ्रान्समध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तिला किंवा मित्राला, प्रियकर-प्रेयसीला पाळीव प्राण्यांच्या नावाने हाक मारणं कॉमन आहे. बीबीसी ट्रॅव्हलच्या एका लेखात याबाबत उल्लेख आहे. एखादा पुरुष आपल्या महिला सहकाऱ्याला mes chats म्हणजेच माय कॅट्स म्हणून हाक मारतो. फ्रान्समध्ये असे अनेक शब्द असून ते आई-वडिलांसह इतरांसाठी वापरले जातात. हे वाचा - फक्त गोवा, शिमला नाही; तर Honeymoon साठी उत्तम आहेत भारतातील ही 10 स्थळं सार्वजनिकरित्या प्रेम व्यक्त करणं - फ्रान्समधील पॅरिस (Paris ) शहरात रस्त्यावर, चौकात, पार्क (park) किंवा ऑफीसजवळ (office) लोक एकमेकांना किस (kiss) करताना दिसतात. इथं याबाबतीत फार मोकळेपणा असून कोणीही ही दृश्य पाहून गोंधळ घालत नाही. याला पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन म्हटलं जातं आणि ते पाश्चिमात्य देशांमध्ये कॉमन आहे. भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये अशा वर्तणुकीवर बंदी असून सार्वजनिकरित्या अशी कृत्ये केल्यास दंड आकारला जातो.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Couple, France, Lifestyle, Love, Relationship

पुढील बातम्या