मुंबई, 11 जानेवारी: छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. रयतेला भरडणाऱ्या आणि रयतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या जुलमी राजवटींविरोधात छत्रपती शिवरायांनी शड्डू ठोकला. सोबत होते फक्त मुठभर मावळे…स्वराज्यावर आलेली अनेक संकटं या मावळ्यांनी अंगावर झेलली. प्रसंगी बलिदान दिलं पण स्वराज्याची ज्योत नेहमीच तेवत ठेवली. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं खरं, पण त्यामागं मोठा वाटा होता तो राजमाता जिजाऊंचा…जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. राजमाता जिजाऊंचे संस्कार हे हिंदवी स्वराज्याचा पाया होते. त्याच जीवावर छत्रपती शिवरायांनी बलाढ्य अशा जुलमी राजवटांशत्रूचा सामना करण्याचं अशक्यप्राय कार्य सिद्धीस नेलं. आज राजमाता जिजाऊंची जयंती . या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मुलांना राजमाता जिजाऊंवर सुंदर भाषण लिहून देऊ शकता. त्यामुळं मुलांना राजमातांच्या कार्याची माहिती मिळेलच आणि हे भाषण सर्वांनाच ऐकायला आवडेल. राजमाता जिजाऊंवरील भाषण लिहून देताना तुम्ही पुढील मुद्द्यांचा भाषणात समावेश करा.
- राजमाता जिजाबाईंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथे झाला.
- त्यांच्या आईचं नाव म्हाळसाबाई आणि वडिलांचं नाव लखुजी जाधव असं होतं.
- लहान वयातच त्यांचा विवाह वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे चिरंजीव शहाजी भोसले यांच्याशी झाला.
- जिजामाता आणि शहाजीराजे यांना दोन मुलं होती. थोरला मुलगा संभाजी शहाजीराजांसोबत असायचे तर धाकटे शिवबा लहानपणापासून जिजामातांसोबत असायचे.
- शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली.
- निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती.
हेही वाचा: स्वप्नात पोपट दिसला तर..? तुम्हालाही दिसतात का पक्षी?
- या जुलमी सत्तांच्या कचाट्यातून रयतेला वाचवायला हवं असं जिजामातांना नेहमी वाटे.
- जिजामातांनी लहानपणापासूनचशिवरायांवर रामायण, महाभारताचे संस्कार केले.
- जिजाबाईंनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर शिवरायांना राजकारणाचे धडेही दिले.
- याच प्रेरणेतून शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.
- हिंदवी स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या. जीव धोक्यात घालावा लागला.
- मात्र जिजामातांनी स्वराज्यासाठी शिवरायांना धोका पत्करण्यापासून रोखलं नाही. त्यांच्या त्यागाच्या जीवावरच हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं.
- परंतु आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि 17 जून 1674 रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले.