मुंबई, 12 जानेवारी : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचं नाव माहीत नसलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. महाराजांसारखं प्रेम दुसऱ्या एखाद्या राजाला खचितच मिळाले असेल. कारण, या राजानं खऱ्या अर्थाने रयतेचं स्वराज्य (Swarajya) उभारलं. बारा मावळातील अठरापगड जातीतील लोक शिवरायांच्या पाठीशी यामुळेच आली. रयतेच्या गवताच्या काडीलाही हात लावू नका, परस्त्री मातेसमान, पर्यावर रक्षण, इतर धर्मीयांचा आदर अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. याचं श्रेय छित्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊंना (rajmata jijau) जाते. खऱ्या अर्थाने त्यांच्या संस्कारातून उभं राहिलेलं स्वराज्य हे इतिहासात आदर्श राज्य मानलं जातं. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती (jijamata birth anniversary) आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी माहिती जाणून घेऊया.
जिजामाता यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली (jijamata jayanti) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे लखुजी जाधव आणि म्हाळसाराणी यांच्या पोटी झाला. त्यांना चार मोठे भाऊ होते. माहेरी त्यांनी राजनीती, युद्धकलेत प्रावीण्य मिळवले. याचा उपयोग पुढे शिवरायांना शिक्षण देण्यासाठी कामास आला. जिजामाता यांचा विवाह 1605 साली शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला.
भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी पतीनिष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजुला ठेवुन कर्तव्याला महत्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रत्येक प्रसंगात उभ्या राहिल्या आणि त्यांचा हाच गुण शिवरायांच्या अंगी देखील आला होता.
शिवाजी महाराजांचा जन्म
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम करणारे शहाजीराजे यांची पत्नी जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजींना जन्माला घातले. त्यांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे. गडावरच्या शिवाई देवीवरुन महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आलं.
शिवाजी महाराजांवरचे संस्कार आणि राज्यकारभाराची जवाबदारी
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जबाबदारी जिजामातेन स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं. शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जबाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे 14 वर्षांचे होते. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तेव्हा पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले.
जिजाबाई शिवाजीमहाराजांच्या आद्यगुरू
पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकऱ्यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत. शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढ्य आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या. शिवाजी महाराजांवर संस्कार करत असताना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करताना समान करावा आणि अपराध करणाऱ्याला कठोरात कठोर शासन करताना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले. जिजाबाई शिवाजीमहाराजांच्या आद्यगुरू होत्या.
तेव्हा राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत
शहाजी राजे बंगळुर येथे चाकरीवर असताना त्या शिवाजी महाराजांच्या आई वडील दोन्ही ही झाल्या. नेटाने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला. सईबाईंच्या अकाली जाण्याने संभाजीराजांची जबाबदारीसुध्दा समर्थपण पेलली. राजांच्या लढायांचा, युध्दांचा सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या.
महाराजांना आग्रा येथे कैद.. Shivaji historic escape from Agra
शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हा कैद झाली होती, त्यावेळी उतारवयात देखील जिजाऊंनी राज्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले.
जिजामातेच निधन Jijamata Death
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी जिजामात यांनी 17 जुन इ.स. 1674 ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड गावी शेवटचा श्वास घेतला. जणु छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतिक्षा होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.