मुंबई, 4 जानेवारी: वैज्ञानिक दृष्टिकोनातून, स्वप्न पाहणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. ज्योतिषशास्त्रानुसार स्वप्ने प्रतीकात्मक असतात. भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल सांगते. स्वप्नशास्त्रामध्ये सर्व प्रकारच्या स्वप्नांचे तपशीलवार वर्णन केले आहे. आज आपण अशा तीन पक्ष्यांबद्दल सांगणार आहोत जे स्वप्नात दिसणे शुभ मानले जाते. हे पक्षी कोणते आहेत आणि ते भविष्याबद्दल काय सूचित करतात ते जाणून घेऊया.शुभ स्वप्ने कधीच कोणाला सांगू नये, अशुभ स्वप्न इतरांना सांगितल्याने त्याचा प्रभाव कमी होतो. नीलकंठ सर्वसाधारणपणे भगवान शिवाशी संबंधित हा पक्षी पाहणेदेखील शुभ मानले जाते. जर हा पक्षी स्वप्नात दिसला तर ते शुभ आहे. जर एखाद्या अविवाहिताला स्वप्नात नीलकंठ पक्षी दिसला तर हे त्याच्यासाठी लवकर लग्नाचे लक्षण आहे.
हंस स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात हंस दिसणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात पांढरा हंस दिसला तर ते तुमच्या कुटुंबात काही शुभ कार्याचे संकेत देते. हंसाची जोडी दिसली तर वैवाहिक जीवनासाठी शुभ असते. पाण्यात तरंगणारा हंस पाहणे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते. पोपट स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पोपट दिसणे खूप शुभ मानले जाते. पोपट पाहणे हे घरात पाहुणे येण्याचे संकेत देते. त्याचबरोबर स्वप्नात पोपटाची जोडी पाहणे प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी शुभ मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)