मुंबई, 20 जून : आजकाल आपली जीवनशैली खूपच बदलली आहे. साहजिकच आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी आणि सवयीदेखील बदलल्या आहेत. आपला हल्ली फास्ट फूड किंवा पदार्थ जास्त प्रमाणात खातो. मात्र आपले शरीर असे अन्न योग्य प्रकारे शोषून घेत नाही. आपल्या शरीराला योग्य आहार आणि पोषक तत्वे देणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची धान्ये आहेत. सर्वच धान्यांचे काही फायदे आणि नुकसान असतात. आज आम्ही तुम्हाला राजगिरा (Rajgira Benefits) या धान्याच्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत. राजगिरा (Amaranth Grains) हे प्राचीन काळापासून वापरले जाणारे अनेक पोषकतत्व असलेले एक धान्य आहे. राजगिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात (Rajgira Is Rich In Protein, Fiber, Vitamins, Minerals). राजगिरा आपण अनेक प्रकारे खाऊ शकतो. राजगिरा शिजवून खाता येतो. तसेच उकडून किंवा त्याचे पॉपकॉर्न आणि गुळासोबत त्याचे पौष्टिक लाडू बनवूनदेखील आपण तो खाऊ शकतो.
Ghee Or Butter: लोणी की तूप? उत्तम आरोग्यासाठी कशाची करावी निवड?राजगिरा खाण्याचे फायदे - राजगिऱ्याच्या अँटिऑक्सिडंट्सचे पावरहाऊस मानले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे A, C, E, K, B5, B6, फॉलेट (Folate), नियासिन (Niacin), रिबोफ्लॅविन (Riboflavin) असते. हे सर्व आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात. - राजगिऱ्याच्या नियमित सेवनामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. - राजगिरा मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त असतो. कारण त्यात प्रोटीन असतात. जी रक्तात लगेच विरघळत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही. - राजगिरा भारतात उपवासाला खाण्यासाठीदेखील वापरला जातो.
Diabetes diet tips : मधुमेहाच्या रुग्णांनी कोणतं ज्यूस पिणं ठरू शकतं फायदेशीर ?- राजगिरा आपल्याला पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन असलेल्या लोकांना राजगिरा खाण्याचा सल्ला दिला जातो. - राजगिऱ्याच्या सेवनाने आपली हाडे आणि दात मजबूत होतात. कारण यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. जे हाडे मजबूत करण्यास आणि उत्तम राखण्यास मदत करते. - राजगिरा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला मनाला जातो. राजगिऱ्यामध्ये असलेले फायटोस्टेरॉल ऑईल शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवते. ते आपल्या हृदयासाठीदेखील खूप चांगले आहेत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)