जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diabetes diet tips : मधुमेहाच्या रुग्णांनी कोणतं ज्यूस पिणं ठरू शकतं फायदेशीर ?

Diabetes diet tips : मधुमेहाच्या रुग्णांनी कोणतं ज्यूस पिणं ठरू शकतं फायदेशीर ?

Diabetes diet tips : मधुमेहाच्या रुग्णांनी कोणतं ज्यूस पिणं ठरू शकतं फायदेशीर ?

सध्याच्या अनियमित आणि चुकिच्या आहारशैलीमुळे अनेकांना मधुमेहाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. परंतु आहारात काही गोष्टींची काळजी घेतल्यास मधुमेहींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जून : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनियमित आणि चुकिच्या आहारशैलीमुळे अनेकांना मधुमेहासारख्या (Diabetes) गंभीर आराजाराचा सामना करावा लागत आहे. हा आजार एकदा जडला की तो आयुष्यभर आपली साथ सोडत नाही. अशा स्थितीत शरिरातील साखरेची पातळी नियंत्रणात (Control sugar level) ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. कारण साखरेची पातळी वाढली तर इतरही काही समस्या (Health Tips) उद्भवू शकतात. परंतु आपल्या आहाराची योग्यरित्या काळजी (Diabetes Diet) घेतल्यास साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे शक्य होते. यासाठी मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचा जूस (Bitter Gourd Juice for Diabetes) अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तसेच इतरही काही जूस आहेत ज्यामुळे साखरेची पातळी (Sugar Level) नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आज आपण जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या जूसचे (Diabetes control Tips) सेवन करणे फायदेशीर ठरू शकते? कारल्याचा जूस - मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचा जूस (Bitter Gourd Juice) अत्यंत फायदेशूर ठरू शकतो. कारल्यात मधुमेहविरोधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी ते गुणकारी ठरते. कारल्याचा जूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण दररोज कारल्याचा जूस पिऊ शकतात.

अंडी उकडल्यानंतर पाणी फेकून देता? फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत

पालकचा जूस - मधुमेहाच्या रुग्णांसाठी पालक देखील अत्यंत उपयुक्त असते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी, ई मुबलक प्रमाणात आढळते. पालकाचा जूस पिल्याने (Spinach juice) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. भोपळ्याचा जूस - मधुमेहाच्या रुग्णांसाठी भोपळ्याचा जूस (Bottle gourd) देखील अत्यंत गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याचा जूस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनही नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तुम्ही रक्तीताल वाढलेल्या साखरेसोबतच वाढलेल्या वजनामुळे देखील त्रस्त असाल तर अशा स्थितीत तुमच्यासाठी भोपळ्याचा जूस अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

Diabetes Risk: मधुमेह ठरू शकतो मृत्यूचं कारण; ‘हे’ 5 पदार्थ खाऊन करा नियंत्रित

आवळा जूस - मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळ्याचा रस (Amla juice) देखील अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. हा जूस बनवण्यासाठी आवळ्याचा दोन चमचे रस काढा आणि त्यात चिमुटभर हळद पावडर घालून ती मिक्स करा. यानंतर तयार झालेले मिश्रण तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी पिऊ शकता. हा जूस पिल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात