मुंबई, 19 जून : आपल्या आहारात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. मात्र त्याचबरोबर त्या पदार्थाला एखादा पर्याय निर्माण झाला की, आपला गोंधळ उडतो. असेच नेहमी गोंधळात टाकणारे दोन पदार्थ म्हणजे तूप आणि बटर.. बऱ्याच लोकांना तूप आणि बटर हे वेगवगेळे आहेत किंवा यांच्या काही फरक आहे हे माहीतच नसते. तसे तर हे दोन्हीही दुधापासून बनणारे पदार्थ आहेत आणि त्यांच्यामध्ये फारसा फरक नाही. मात्र तरीही हे दोन्हीही वेगळे आहेत. आज आम्ही तुमच्या डोक्यातील हा संभ्रम कमी करण्यासाठी या दोन्हीमधले काही फरक आणि साधर्म्य सांगणार आहोत. यानंतर तुमच्यासाठी या दोन्हींपैकी काय योग्य आहे? हे ठरवणे तुम्हाला सोपे जाईल.
बऱ्याच कारणांमुळे तूप आणि बटर खाणे टाळले जाते (People Avoid Eating Ghee And Butter). हल्ली लोकांना हाय ब्लडप्रेशर आणि लठ्ठपणाच्या समस्या जास्त प्रमाणात येत आहेत. त्यामुळे लोक तूप आणि बटर खाणे टाळतात. मात्र तूप आणि बटर हे दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. तूप आणि बटर हे दोन्हीही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स, रिबोफ्लेविन, फॉस्फरस आणि कॅल्शियमने समृद्ध असतात (Ghee And Butter Are Rich In Vitamin A, Vitamin E, Antioxidants, Riboflavin, Phosphorus, Calcium). त्यामुळे यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. तूप चवीला किंचित खारट असते तर बटर थोडे गोडसर आंबट असते.
प्लास्टिक सर्जरीवर भारतात लो बजेट पर्याय सापडला; 25 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली
तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण बटरपेक्षा थोडे जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी तुपापेक्षा बटर चांगला पर्याय ठरू शकतो. प्रोटीनचे प्रमाण तुपामध्ये बटरपेक्षा जास्त असते. त्यामुळे ज्या लोक्कां प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे त्यांनी तुपाचीच निवड करावी. बटर तुमची डोळे निरोगी ठेवण्यात मदत करते.
Weight Loss: पुरुषांनी वजन कमी करण्याचं टेन्शन सोडून द्या; फक्त या 5 सोप्या टिप्स वापरा
त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटाच्या कॅन्सरपासूनही तुमचा बचाव करते. तुपदेखील कॅन्सरसोबत लढण्यात मदत करते आणि त्याचबरोबर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवरदेखील हे उपयुक्त आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bread butter, Ghee, Health Tips