Home /News /lifestyle /

गर्लफ्रेंडच्या आईबाबांना पाहून फुटला घाम; तिच्या घरातून ठोकली धूम, भारत सोडून थेट गाठलं पाकिस्तान

गर्लफ्रेंडच्या आईबाबांना पाहून फुटला घाम; तिच्या घरातून ठोकली धूम, भारत सोडून थेट गाठलं पाकिस्तान

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना घाबरून त्यांच्यापासून दूर पळता पळता तरुण पाकिस्तानातील तुरुंगात गेला.

    जोधपूर, 23 जानेवारी :बॉयफ्रेंड (boyfriend) गर्लफ्रेंडला (girlfriend) भेटण्यासाठी तिच्या घरी गुपचूप गेला. तिच्या घरात घुसून तिला भेटण्याचा प्रयत्न केला आणि अचानक तिचे आईवडील किंवा कुटुंबच त्याच्यासमोर आलं, तर तो बॉयफ्रेंड काही ना काही कारण देऊन कसा धूम ठोकून पळतो हे आपण फिल्ममध्ये पाहिलंच आहेच. असंच काहीसं प्रत्यक्षात घडलं आहे. गर्लफ्रेंडच्या घरात घुसला आणि तिच्या आईवडीलांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्यानं तिथून धूम ठोकली तो थेट राजस्थानमधून (rajasthan) पाकिस्तानाच (pakistan) पोहोचला. राजस्थानच्या बाडमेरमधील 19 वर्षाचा गेमरा राम मेघवाल. हा भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुम्हारोतील टिब्बाचा रहिवासी आहे. तो त्याच्या शेजारी राहणाऱ्या गर्लफ्रेंडच्या घरी गेला. तेव्हा तिचे आईवडीलही घरात होते. तिच्या आईवडिलांना पाहताच त्याला घाम फुटला आणि भीतीनं त्यानं गर्लफ्रेंडच्या घरातून धूम ठोकली. तो इतका पळाला इतका पळाला की थेट पाकिस्तानात पोहोचला. त्यानं त्याच रात्री भारत-पाक सीमा पार केली आणि पाकिस्ताना पोहोचला. तिथं त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. हे वाचा - सेक्स करू शकते पण लग्न नाही; महिलेच्या लव्हस्टोरीत आजार बनला व्हिलन गेमरा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबानं 16 नोव्हेंबर, 2020 ला बिजराड पोलीस ठाण्यात नोंदवली. तो पाकिस्तानात गेल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. कारण त्यांचे नातेवाईक भारत-पाक सीमवरील पाकिस्तानातील पबनी गावात राहतात. गेमरा तिथं जाणार होता. तसंच  पाकिस्तानात एक मुलगा सीमा ओलांडून आला आहे, त्याला पाकिस्तानी पोलिसांनी अटक केल्याचंही त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं, अशी माहिती त्याच्या कुटुंबानं पोलिसांना दिली. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना बिजराड पोलिसांनी सांगितलं की, या मुलाचं त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्या कुटुंबानं सांगितलं की 4 नोव्हेंबर, 2020 तो तिच्या घरी गेला होता तेव्हा तिच्या पालकांनी पाहिलं. तेव्हापासून तो घरी आला नाही. हे वाचा - पठ्ठ्याने थाटलाय 27 जणींसोबत एकाच छताखाली संसार!हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब पोलीस तपासात गेमरा पाकिस्ताना असल्याचं समजलं. त्यानं 4 नोव्हेंबरला भारत-पाकिस्ताना सीमा पार केली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान आता त्याला भारतात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पाकिस्तानासोबत चर्चा केली आहे. तो सिंध पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला सोडलं जाणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Rajasthan, Relationship

    पुढील बातम्या