लंडन, 23 जानेवारी : प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. आपल्याला आयुष्याचा चांगला जोडीदार मिळावा. त्याच्यासोबत आपण सुखी संसार करावा. खरं तर मुलगी वयात येते आणि तिला प्रेम, जोडीदार याचा अर्थ समजू लागतो तेव्हापासून ती अशी स्वप्नं रंगवू लागतात. मनासारखा राजकुमार भेटल्यानंतर या प्रत्येक स्वप्नात तोदेखील तिच्यासोबत असतो. पण अनेकदा अशा लव्हस्टोरी (love story) एखादा व्हिलन तर असतोच. ब्रिटनमधील (britain) महिलेच्या लव्हस्टोरीतही असाच व्हिलन आला. पण तो माणसच्या रूपानं नव्हे तर आजाराच्या रूपानं.
आजारी असलेली ही महिला ती ज्याच्यावर प्रेम करते, त्याच्यासोबत सेक्स तर करू शकते. पण लग्न नाही. इच्छा असूनही ती त्याच्यासोबत सुखी संसार थाटू शकत नाही आणि याचं कारण म्हणजे तिला झालेला आजार.
69 वर्षांची ही महिला केअर होममध्ये राहते. तिथंच राहणाऱ्या एका व्यक्तीवर तिचं प्रेम जडलं. तिला त्याच्याशी लग्नही करायचं होतं. पण कोर्टानं तिला त्याच्यासोबत लग्न करण्याची परवानगी नाकारली आहे. ती त्याच्यासोबत सेक्स करू शकते पण लग्न नाही, असा निर्णय कोर्टानं दिला आहे.
हे वाचा - पत्नी की वडील? मृत व्यक्तीच्या स्पर्मवर कोणाचा हक्क; उच्च न्यायालयाचा निर्णय
कोर्टानं असा अजब निर्णय देण्याचं कारण म्हणजे त्या महिलेला असलेला मानसिक आजार. या महिलेला डिमेन्शिया आहे. ज्यामध्ये व्यक्तीला विसराळूपणा येतो, त्या व्यक्तीमध्ये निर्णय घेण्याचीही क्षमता नसते.
आज तकनं ब्रिटिश टेलिग्राफच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटिश सोशल सर्व्हिस काऊन्सिलनं या महिलेबाबत कोर्टाकडून निर्णय मागितला होता. लंडन हायकोर्टानं याबाबत आपला निकाल दिला आहे. लग्नाबाबत निर्णय घेऊ शकते इतकी या महिलेची मानसिक क्षमता नाही. पण ती सेक्शुअल रिलेशनशिपबाबत निर्णय घेऊ शकते, असं कोर्टानं म्हटलं.
हे वाचा - प्रेमात ब्रेकअप झालेल्या या तरुणानं उचललं असं भन्नाट पाऊल, की कथा झाली व्हायरल!
न्यायाधीशांनी सांगितलं की, महिलेजवळ घर, आर्थिक आणि लग्नासंबंधी निर्णय घेण्याची मानसिक क्षमता नाही. घटस्फोटासारखी परिस्थिती उद्भवली तर पैसे आणि संपत्तीचं काय होऊ शकतं, याचा अंदाजाही या महिलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.