पठ्ठ्याने थाटलाय 27 जणींबरोबर एकाच छताखाली संसार! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब

पठ्ठ्याने थाटलाय 27 जणींबरोबर एकाच छताखाली संसार! हे आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब

कॅनाडामधील (Canada) 19 वर्षीय मर्लिन ब्लॅकमोर या तरुणाने आपल्या कुटुंबाचा (Family) टिक टॉकवर खुलासा केला आहे.

  • Share this:

टोरंटो, 23 जानेवारी : भावंडांमधील भांडणं, प्रत्येकाचे वेगवेगळे विचार ही कुटुंबातील सामान्य बाब आहे. पण एखाद्या कुटुंबात 150 भावंडं असतील तर? ही फक्त कल्पना नाही, तर हकीकत आहे. कॅनाडामधील (Canada) 19 वर्षीय मर्लिन ब्लॅकमोर या तरुणाने आपल्या कुटुंबाचा (Family) टिक टॉकवर खुलासा केला आहे.

27 पत्नी, 150 भाऊ-बहीण -

या कुटुंबात मर्लिनच्या वडिलांच्या 27 पत्नी आणि सगळी मिळून ती 150 भावंडं आहेत. हे कॅनडातील सर्वात मोठी बहुविवाही कुटुंब असल्याचं सांगण्यात आलं आहे. या कुटुंबाचे प्रमुख विस्टन ब्लॅकमोर 64 वर्षांचे आहेत. सध्या ते ब्रिटिश कोलंबियामध्ये आल्या भल्यामोठ्या कुटुंबासोबत राहतात. या कुटुंबातील तीन मुलांनी सर्वांसमोर याबाबत माहिती दिली आहे.

मर्लिनसह त्याची दोन भावंडं मरे (19) आणि वारेनने (21) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या कुटुंबाची कहाणी सांगितली. यांना आधी आपल्या कुटुंबाबाबत सांगताना शरम वाटायची परंतु आता त्यांनी यावर बोलण्यास सुरुवात केली.

(वाचा - आजी रॉक्स बाकी सगळे शॉक, 89व्या वर्षी चालवली नातवाची हुंदई कार! पाहा हा VIDEO)

मर्लिनने टिकटॉकवर सांगितलं की, तो आता त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. तो अमेरिकेत शिफ्ट झाला आहे. आमच्या कुटुंबाबाबत मागील चार वर्षांपासून बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. विस्टन यांच्या 27 पत्नी आहेत, परंतु आता 22 जणी त्यांच्यासोबत राहतात. प्रत्येक मुलाला त्याच्या आईला 'मम' आणि वडिलांच्या इतर पत्नींना मां आणि त्यापुढे त्या प्रत्येकीचं नाव घेऊन बोलण्याची ट्रेनिंग देण्यात आली.

इतक्या मोठ्या कुटुंबातील अधिकतर मुलं आपल्या आईसोबत राहत नाहीत. सर्वात मोठा भाऊ वारेनने सांगितंल की, सामान्यपणे एका घरात दोन पत्नी आपल्या मुलांसोबत राहतात. प्रत्येकी एका फ्लोअरवर त्यांनी घरं आहेत.

हे कुटुंब इतकं मोठं आहे की एक कम्युनिटीच बनते. ही फॅमिली शेतीवर आपलं घर चालवते. मुलांना शेती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मर्लिन, मरे आणि वारेन यांनी आपलं कुटुंब सोडलं असून ते वेगळे राहतात. ते कधीतरी आपल्या भावा-बहिणींच्या संपर्कात असतात.

Published by: Karishma Bhurke
First published: January 23, 2021, 3:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या