जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / First Take कला महोत्सवात पुणे आणि ठाण्याच्या तरुण कलाकारांची बाजी

First Take कला महोत्सवात पुणे आणि ठाण्याच्या तरुण कलाकारांची बाजी

First Take कला महोत्सवात पुणे आणि ठाण्याच्या तरुण कलाकारांची बाजी

देशभरातल्या 250 ठिकाणांहून चित्रकला, स्कल्पर्स अशा विविध कलाप्रकारातल्या 2500 कलाकृती सादर करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्याच्या शुभंकर चंदेरे आणि ठाण्याची किन्नरी तोंडलेकरलाही पुरस्कार मिळाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    दिल्ली, 19 नोव्हेंबर: देशभरातल्या विविध ठिकाणाहून आलेल्या तरुण कलाकारांचं एक सुंदर प्रदर्शन  अबिर इंडियाने आयोजित केलं होतं. First Take या कला महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत देशभरातून पुणे आणि ठाण्याच्या स्पर्धकांनी बाजी मारली आहे. देशभरातल्या 250 ठिकाणांहून चित्रकला, स्कल्पर्स अशा विविध कलाप्रकारातल्या 2500 कलाकृती सादर करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्याच्या शुभंकर चंदेरे आणि ठाण्याची किन्नरी तोंडलेकरलाही पुरस्कार मिळाला आहे. अहमदाबादच्या अबिन इंडिया या स्वयंसेवी संस्थेतर्फे देशातल्या तरुण कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या दृष्टीने दर वर्षी फर्स्ट टेक हा कला महोत्सव भरवला जातो. यंदाचं हे पाचवं वर्षं होतं. या कलामहोत्सवातल्या प्रदर्शनांमधून कलाकार आणि कलाप्रेमी यांची भेट होते. त्यांच्या कलेला दाद आणि खरेदीदारही मिळतात. पेंटर, डिझायनर आणि नॅचरल डाय एक्सपर्य रुबी जागृत यांच्या पुढाकाराने हा महोत्सव भरवला जातो. Education Loan : शैक्षणिक कर्ज कसं घ्यायचं? कागदपत्र काय लागतात? वाचा सर्वकाही या महोत्सवामध्ये पुरस्कार मिळालेल्या कलाकारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची भेट आणि ट्रॉफी देण्यात आली. या महोत्सवात पुण्याच्या शुभंकर सुरेश चंदेरे आणि ठाण्याच्या किन्नरी जितेंद्र तोंडलेकर यांना सन्मानित करण्यात आलं. याशिवाय हैदराबादची श्रीपमा दत्त, आसामचा जिंतू कलिता, कोलकात्याची प्रिया पुरकाइत, बंगाला असीफ इम्रान, हिमाचल प्रदेशचा चेरिंग नेगी, गुजरातचे ऋत्विक मेहता, मौशम मंगला आणि जितिन कुमार यांच्याही कलाकृतींना पुरस्कार मिळाला. ‘Indian Idol Marathi’च्या मंचावर घुमला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आवाज… कलाकारांनी विविध कला प्रकारांमध्ये आणि माध्यमांमध्ये त्यांची कला सादर केली. अॅक्रेलिक, लिनोकट्स, स्कल्पर्स अशा मिक्स मीडियातून रंग भरले गेले. कलाकारांच्या कलेला अधिक उंच भरारी देण्यासाठी वाव देणे आणि हातभार लावण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.  या महोत्सवात 122 निवडक कलाकारांपैकी 10 कलारांना पुरस्कार देण्यात आले. के. एस. राधाकृष्णन, आर एम पलनीअप्पन, वासुदेवन अक्कितम, ख्रिस्टिन मायकेल आणि हार्टमट वुर्स्टर यांनी कलाकृतींचं परीक्षण केलं

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: art , pune , thane
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात