• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'Indian Idol Marathi'च्या मंचावर घुमला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आवाज; ऑडिशनने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

'Indian Idol Marathi'च्या मंचावर घुमला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आवाज; ऑडिशनने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

इंडियन आयडल मराठीच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक-गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.

 • Share this:
  मुंबई,  19 नोव्हेंबर-  छोट्या पडद्यावर  (Tv Show) नुकताच 'इंडियन आयडॉल १२' हा लोकप्रिय शो पार पडला. या पर्वाने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या पर्वाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. यामध्ये नचिकेत, सायली, आशिष आणि अंजलीसारखे अनेक मराठी स्पर्धकसुद्धा होते. या स्पर्धकांना अख्या महाराष्ट्राने प्रचंड प्रेम दिलं आहे. त्यांनतर आता महाराष्ट्राच्या इतर मुला-मुलींच्या गोड गळ्याला वाव देण्यासाठी 'इंडियन आयडॉल' मराठीमध्ये  (Indian Idol Marathi)  आपल्या भेटीला येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर येत्या २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करत आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत. संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. मराठी आयडल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
  इंडियन आयडल मराठीच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक-गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही. अजय-अतुल यांनी मनोरंजनसृष्टीत खूप कष्टाने स्वतःचं वेगळं नाव प्रस्थपित केलं आहे. त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार आहेत. आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीने स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे. आणि या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स करत आहे. उत्कृष्ट स्पर्धक, अनुभवी परीक्षक यांना घेऊन सुरू होणारा हा सुरांचा प्रवास २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर रसिकी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.सध्या या कार्यक्रमाच्या ऑडिशनचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये मुला-मुलींचे आवाज पाहून सर्वच थक्क होत आहेत. नुकताच अजय-अतुल या जोडीने या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातदेखील हजेरी लावली होती.
  Published by:Aiman Desai
  First published: