मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Education Loan : शैक्षणिक कर्ज कसं घ्यायचं? कागदपत्र काय लागतात? वाचा सर्वकाही

Education Loan : शैक्षणिक कर्ज कसं घ्यायचं? कागदपत्र काय लागतात? वाचा सर्वकाही

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल, तर आता तुमच्यासाठी (Higher Education In Abroad) मार्ग खूप सोपा झाला आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास, तुम्ही भारतात शिक्षण कर्ज घेऊन पुढील अभ्यास पूर्ण करू शकता.

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल, तर आता तुमच्यासाठी (Higher Education In Abroad) मार्ग खूप सोपा झाला आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास, तुम्ही भारतात शिक्षण कर्ज घेऊन पुढील अभ्यास पूर्ण करू शकता.

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल, तर आता तुमच्यासाठी (Higher Education In Abroad) मार्ग खूप सोपा झाला आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास, तुम्ही भारतात शिक्षण कर्ज घेऊन पुढील अभ्यास पूर्ण करू शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 19 नोव्हेंबर : उच्च आणि दर्जेदार शिक्षण घेणे आज सोपी गोष्ट राहिली नाही. बुद्धीमत्ता असूनही अनेकजण केवळ पैशाअभावी उच्च शिक्षणापासून ( Higher Education) वंचित राहतात. मात्र शिक्षणासाठी मिळणाऱ्या लोनमुळे मुलांची ही अडचण काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे अनेकजण उच्च शिक्षणाचं आपलं स्वप्न पूर्ण करु शकत आहेत. जर तुमच्या घरातील कोणाला शिक्षणासाठी एज्युकेशन लोन ( Higher Education Loan) घ्यायचे असेल तर त्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला देशातील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असेल, तर आता तुमच्यासाठी (Higher Education In Abroad) मार्ग खूप सोपा झाला आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास, तुम्ही भारतात शिक्षण कर्ज घेऊन पुढील अभ्यास पूर्ण करू शकता.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय?

उच्च शिक्षणासाठी कोणत्याही बँक किंवा खाजगी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाला विद्यार्थी कर्ज (Student Loan) किंवा शैक्षणिक कर्ज (Education Loan) म्हणतात. या कर्जाचा लाभ घेऊन कोणताही विद्यार्थी आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतो. तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असले तरी कोणत्याही बँकेच्या अटी व शर्तींचे पालन करून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता.

शैक्षणिक कर्जाचे प्रकार?

भारतात साधारणपणे 4 प्रकारचे विद्यार्थी कर्ज आहेत (Eduacation Loan Types)

>> करिअर एज्युकेशन लोन (Career Education Loan) – जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेतून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तेव्हा तो करिअर एज्युकेशन लोन घेऊ शकतो.

>> प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन (Professional Graduate Student Loan) - प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यास सुरू ठेवण्यासाठी घेतले जाऊ शकते.

>> पालक कर्ज (Parents Loan) - जेव्हा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.

>> अंडरग्रेजुएट लोन (Undergraduate Loan)- शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, देशात आणि परदेशात पदवी मिळवण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.

तुमच्या स्वप्नातील Job! अवघे 14 दिवस करा काम आणि मिळवा तब्बल 9 लाख रुपये पगार

शैक्षणिक कर्ज कसे घ्यावे?

विद्यार्थी कर्ज घेण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

>> सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा.

>> नंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा.

>> बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या.

>> बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा.

>> बँक आणि तुमची खात्री झाल्यावर कर्जासाठी अर्ज करा.

तरुण प्रोफेशनल्सना Job Ready बनवण्यासाठी TCS चा Free Online Course

शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे?

> वयाचा पुराव (Age proof)

>पासपोर्ट साइज फोटो (Passport size photograph)

>मार्कशीट (Marksheet)

>बँक पासबुक (Bank passbook)

> आईडी प्रूफ (ID proof)

>एड्रेस प्रूफ (Address proof)

> कोर्स डिटेल्स (Course details)

> विद्यार्थी आणि पालकांचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड (Parents and Student’s PAN card and Aadhar card)

> पालकांचा उत्पन्नाचा दाखला (Parents income proof)

First published:

Tags: Education, Loan