मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘हा’ आजार पोखरतो दात आणि हिरड्या; वेळ निघून जाण्याआधी लक्ष द्या

‘हा’ आजार पोखरतो दात आणि हिरड्या; वेळ निघून जाण्याआधी लक्ष द्या

अमेरिकन टूथपेस्ट ब्रॅन्ड कोलगेट मधील तज्ञांच्यामते, ओठ चावण्याच्या सवय असेल तर 5 गोष्टी कारणीभूत असू शकतात.

अमेरिकन टूथपेस्ट ब्रॅन्ड कोलगेट मधील तज्ञांच्यामते, ओठ चावण्याच्या सवय असेल तर 5 गोष्टी कारणीभूत असू शकतात.

हिरड्यांशींसंबंधीत आजार पायोरिया (Pyorrhoea) टाळण्यासाठी दातांच्या स्वच्छतेची विशेष काळजी (Special Care) घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पायोरियाची लक्षणं आणि उपाय माहिती असायला हवेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : पायोरियामुळे (Pyorrhoea) खराब होणाऱ्या दातांवर करा उपचार पायोरिया किंवा पेरियडॉन्टायटीस हा हिरड्यांचा गंभीर आजार (Severe Gum Disease)आहे. या आजाराची योग्य माहिती नसल्याने त्यावर वेळीच उपचार (Treatment) होत नाहीत आणि त्याचा त्रास दातांना सहन करावा लागतो. आपल्या दातांमध्ये असे अनेक बॅक्टेरिया(Bacteria)असतात जे हळूहळू दातांच्या आसपास जमा होऊ लागतात. खाल्लेल्या अन्नातून ते जास्त वाढतात. त्यानंतर हिरड्या आणि जबड्याची हाडं (Gums & Jaw Bones)खराब करतात. यामुळे हळूहळू हाडं कमजोर होऊ लागतात. यालाच पायोरिया म्हणतात. योग्य वेळी उपचार न केल्यास पायोरिया वेगाने पसरतो आणि हळूहळू दात हलू लागतात. त्यानंतर दात काढण्याची वेळ येते.

पायोरियाची लक्षण

ब्रश करताना हिरड्यातून रक्त येणं, तोंडाला दुर्गंधी येणं,दातांच्या स्थितीत बदल होणं. लाल,मउ पडलेल्या किंवा सुजलेल्या हिरड्या. अन्न चावताना दात दुखणं, तोंडात वाईट चव येणं अशी लक्षणं दिसतात.

(नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम)

पायोरिया का होतो?

व्यवस्थित ब्रश न केल्यामुळे विषाणू तोंडात वाढत जातात आणि प्लाक (Dental plaque) तयार करतात. ब्रश न केल्यास हळूहळू बॅक्टेरिया प्लाकमध्ये जमा होतात त्यानंत टार्टर (Tartar) तयार होतो. यामुळे दात आणि हिरड्याचं नुकसान होतं.

(फक्त या 7 सवयी लावा; स्मरणशक्ती वाढेल, मेंदू होईल तल्लख)

पायोरियाची कारणं

धूम्रपान करणे (Smoking), टाईप -2 डायबेटिज (Type 2 Diabetes), लठ्ठपणा, हार्मोनल बदल (Hormonal Changes), रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं, पोषणमुक्ता आहाराची कमतरता, व्हिटॅमिन सीची (Vitamin C) कमतरता अशी लक्षणं दिसतात.

(मुंबईसह पाण्यात बुडणार 12 शहरं; NASA चा धक्कादायक रिपोर्ट)

पायरियावर उपचार

स्केलिंग आणि पॉलिशिंगच्या सहाय्याने दातांवर जमा झालेला प्लाक काढणं. काही खाल्यानंतर गुळण्या करणे तोंड स्वच्छ ठेवणं.1 चमचा मीठ कोमट पाण्यात मिसळून त्याच्या गुळण्या करणे, त्रास होत असल्यास अ‍ॅन्टीबायोटिक घ्याव्यात. यानेही फरक नीही पडला तर फ्लॅप सर्जरी करावी लागते. पायोरिया टाळण्यासाठी टिप्सदिवसातून किमान दोनदा दातांना ब्रश करा, धूम्रपान टाळा, शक्यतो फ्लोराईड टूथपेस्ट वापरा, फायबरयुक्त आहार घ्या, वर्षातून एकदा डेन्टीस्ट कडून दातांची  तपासणी करून घ्या.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Proper care