मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

What is Surrogacy: ज्याद्वारे प्रियांका आई बनली ती सरोगसी म्हणजे काय रे भाऊ? भारतात आहेत हे नियम

What is Surrogacy: ज्याद्वारे प्रियांका आई बनली ती सरोगसी म्हणजे काय रे भाऊ? भारतात आहेत हे नियम

2018 साली विवाहबंधनात अडकलेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) सरोगसीद्वारे एक बाळाचे आई-वडील झाले आहेत. पण सरोगसी म्हणजे नेमकं काय? यात काय प्रक्रिया असते? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील

2018 साली विवाहबंधनात अडकलेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) सरोगसीद्वारे एक बाळाचे आई-वडील झाले आहेत. पण सरोगसी म्हणजे नेमकं काय? यात काय प्रक्रिया असते? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील

2018 साली विवाहबंधनात अडकलेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) सरोगसीद्वारे एक बाळाचे आई-वडील झाले आहेत. पण सरोगसी म्हणजे नेमकं काय? यात काय प्रक्रिया असते? असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील

मुंबई, 22 जानेवारी: लग्न आणि आई-वडील होणं या दोन गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. मात्र काही स्त्रियांना सहज गर्भधारणा होते, तर काही जोडप्यांना अनेकदा प्रयत्न करूनही मुलं होत नाही. अशा दाम्पत्यांसाठी विज्ञानानं विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. सरोगसी (Surrogacy) हा त्यापैकीच एक पर्याय आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) नुकताच या पर्यायाचा वापर केला आहे.

2018 साली विवाहबंधनात अडकलेले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) सरोगसीद्वारे एका बाळाचे आई-वडील झाले आहेत. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. सरोगसी तंत्राच्या मदतीने आई होणारी प्रियांका ही काही एकमेव अॅक्टर नाही. यापूर्वी प्रीती झिंटा, शिल्पा शेट्टी, शाहरूख खान, आमीर खान, करण जोहर, एकता कपूर आणि तुषार कपूर यांसारखे बॉलिवूडमधले अनेक कलाकार सरोगसीद्वारे आई-वडील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरोगसी काय आहे, त्या तंत्राचा वापर कोण करू शकतं, भारतामध्ये याबाबत कोणते नियम आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

हे वाचा-प्रियंका चोप्राकडून गुड न्यूज! घरी बाळाचं आगमन

एखादं जोडपं मूल जन्माला घालण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयाचा (uterus) वापर करतं, त्या प्रक्रियेला सरोगसी म्हणतात. म्हणजेच सरोगसीमध्ये एखादी स्त्री आपल्या स्वत:च्या किंवा डोनरच्या एग्जद्वारे दुसऱ्या जोडप्यासाठी प्रेग्नंट (Pregnant) होते. सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्यामागे अनेक कारणं आहेत. एखाद्या जोडप्याला वैद्यकीय समस्या असल्यास, स्त्रीच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास, गर्भधारणेमुळे कोणतीही समस्या उद्भवू शकणार असल्यास किंवा एखाद्या स्त्रीला स्वतःला मूल होऊ देण्याची इच्छा नसल्यास सरोगसीचा आधार घेतला जातो.

दुसऱ्याचं मूल आपल्या पोटात वाढवणाऱ्या स्त्रीला 'सरोगेट मदर' (Surrogate mother) म्हणतात. सरोगसी प्रक्रियेमध्ये, मूल होऊ इच्छिणारं जोडपं आणि सरोगेट मदर यांच्यात एक करार केला जातो. या करारानुसार गर्भधारणेतून जन्मलेल्या मुलाचं कायदेशीर पालकत्व सरोगसीसाठी इच्छुक असणाऱ्या जोडप्याकडे असतं. सरोगेट मदरला प्रेग्नन्सीदरम्यान स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय गरजांसाठी पैसे दिले जातात.

हे वाचा-काय? समंथा-नागा चैतन्य पुन्हा एकत्र? अभिनेत्रीने हटवली घटस्फोटाची पोस्ट

कोरोना महामारीनंतर गेल्या दोन वर्षांपासून मंदी आणि बेरोजगारीमुळे सरोगेट मदर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. इतरांच्या घरी साफसफाई, धुणी-भांडी आणि किरकोळ काम करणाऱ्या महिला किंवा कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी कमी वेळेत जास्त पैसे कमवण्यासाठी सरोगसीचा अवलंब केला आहे. कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी, मुलांची योग्य काळजी घेण्यासाठी, एखाद्याच्या शिक्षणाचा किंवा उपचाराचा खर्च उचलण्यासाठी तरुण वर्गातल्या महिलांना सरोगसी हा पैसे कमावण्याचा सोपा मार्ग वाटतो.

सरोगसीचे दोन प्रकार

सरोगसी प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. ट्रेडिशनल सरोगसीमध्ये (Traditional Surrogacy) वडिलांच्या/डोनरच्या स्पर्म्सचं (Sperm) सरोगेट मदरच्या एग्जशी मीलन घडवून आणलं जातं. या सरोगसीमध्ये सरोगेट मदर हीच त्या बाळाची जैविक म्हणजेच बायोलॉजिकल आई (Biological Mother) असते. जेस्टेशनल सरोगसी या दुसऱ्या प्रकारामध्ये, सरोगेट मदरच्या एग्जचा वापर होत नाही. म्हणून सरोगेट मदरचं बाळाशी जेनेटिक रिलेशन नसतं. ती फक्त मुलाला जन्म देते. या प्रकारामध्ये होणाऱ्या बाळाच्या वडिलांचे स्पर्म आणि आईचे एग्ज यांचं मीलन घडवलं जातं.

सहज आई न होऊ शकणाऱ्या महिलांसाठी सरोगसी हे वरदान असलं तरी त्याचा दुरुपयोग होत असल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे भारतात सरोगसीसाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. बहुतांश गरीब महिला तर आर्थिक अडचणींमुळं सरोगेट मदर होतात, ही गोष्ट लक्षात घेऊन 2019 मध्ये सरकारनं कमर्शियल सरोगसी (Commercial surrogacy) या प्रकारावर बंदी घातली आहे. त्यानंतर, केवळ मदतीच्या हेतूनं सरोगसी करण्याचा पर्याय खुला राहिला आहे. कमर्शियल सरोगसीवर बंदी घालण्याबरोबरच, अल्ट्रस्टिक सरोगसीबाबतचे नियम आणि कायदेही कडक केले गेले आहेत.

हे वाचा-तुम्हाला माहीत आहे का चित्रपटाच्या शुटींगनंतर अभिनेत्यांच्या कपड्यांचं काय होतं?

या नियमांअंतर्गत फॉरेनर्स, सिंगल पॅरेंट, घटस्फोटित जोडपं, लिव्ह-इन पार्टनर आणि एलजीबीटी समुदायातल्या व्यक्तींसाठी सरोगसीचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. सरोगसीसाठी सरोगेट मदरकडे वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. असं सर्टिफिकेट असेल तरच ती स्त्री सरोगेट मदर होऊ शकते. त्यासोबतच सरोगसीचा अवलंब करणाऱ्या जोडप्याकडे वंध्यत्वाचं (Infertility) वैद्यकीय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

2020मध्ये सरोगसी रेग्युलेशन अॅक्टमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये कोणत्याही 'इच्छुक' महिलेला सरोगेट मदर बनण्याची परवानगी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Nick jonas, Priyanka chopra