जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby : प्रियंका चोप्राकडून गुड न्यूज! सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन

Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby : प्रियंका चोप्राकडून गुड न्यूज! सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन

Priyanka Chopra and Nick Jonas welcome baby : प्रियंका चोप्राकडून गुड न्यूज! सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन

Priyanka Chopra Blessed with Child: 1 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. गेल्या महिन्यात या इंडो-अमेरिकन जोडप्याच्या लग्नाला तीन (Nick Priyanka Marriage) वर्षं पूर्ण झाली आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 22 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने  (Priyanka Chopra) गुड न्यूज दिली आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनस  (Nick Jonas) यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. प्रियंकाने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर याबाबतची गुड न्यूज शेअर केली आहे. आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. याबाबतची बातमी देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या आनंदाच्या आणि विशेष क्षणात आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत आहोत, असं प्रियंका म्हणाली आहे. विशेष म्हणजे निक आणि प्रियांकाला याआधी अनेकदा बाळाच्या आगमनाबाबत जाहिरपणे प्रश्नही विचारण्यात आले होते. दोघेही या प्रश्नांना टाळताना दिसत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्वत: प्रियांकानं आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबत (Priyanka Chopra Family Planning) भाष्य केलं होतं. ‘निक आणि माझ्या मॅरिड लाईफमध्ये बेबीला (Baby) महत्त्वाचं स्थान आहे. भविष्याचा विचार करून आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं आहे’, अशी प्रतिक्रिया प्रियांकानं दिली होती. एका मुलाखतीदरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेतून तिनं आई होण्याची इच्छा व्यक्ती केली होती.

    जाहिरात

    ‘व्हॅनिटी फेअर’ (Vanity Fair) या प्रसिद्ध मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका चोप्रानं आपलं काम, फॅमिली आणि फॅमिली प्लॅनिंगबाबत मोकळेपणानं माहिती दिली होती. आई होणं हे टू-डू लिस्टमध्ये आहे का? असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता. त्यावर तिनं आपलं मत मांडलं होतं. ‘स्वत: चं घर खरेदी करणं आणि आई होणं या दोन्ही गोष्टी कायम प्रायोरिटीवर आहेत. सध्या निक आणि मी आपापल्या कामात व्यस्त आहोत. अद्याप अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी केलेल्या नाहीत. त्या करण्याची माझी इच्छा आहे. तसं पाहिल्यास आम्ही इतकेही बिझी नाहीत. आम्ही आत्ताही बेबी प्लॅन करू शकतो. मात्र, कामाच्या गोंधळात मला फॅमिलीपासून दूर राहणं आवडणार नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक बेबी प्लॅनिंग केलेलं आहे. भविष्यात मला आई होणं नक्कीच आवडेल पण, आम्हाला सध्या घाई करायची नाही’, असं प्रियांका म्हणाली होती. ( लता दीदींच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट; डॉक्टरांची वेट अँड वॉच भूमिका ) प्रियंका आणि निक जोनस हे दोघं 1 डिसेंबर 2018 रोजी लग्नबेडीत अडकले होते. मोठ्या थाटात त्यांचा विवाह पार पडला होता. दोघांचं लग्न भारतीय पद्धतीने जयपूरमध्ये पार पडलं होतं. खरंतर ते दोघं मे महिन्यात 2018 मध्ये एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या या प्रेमाचं काही महिन्यांनी लग्नात रुपांतर झालं होतं. लग्नानंतरही हे जोडपं कायम चर्चेत राहतं. निक जोनस हा अमेरिकेतला प्रसिद्ध गायक आहे. प्रियंका लग्नानंतर निकसोबतच अमेरिकेत राहते. पण प्रियंका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे भारतीय चाहत्यांसोबत तिचं एक वेगळं भावनिक कनेक्शन आहे. पॉप स्टार निक जोनास  (Nick Jonas)   आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा  (Priyanka Chopra)   हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. कायम सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करून ते आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. 1 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. गेल्या महिन्यात या इंडो-अमेरिकन जोडप्याच्या लग्नाला तीन  (Nick Priyanka Marriage)   वर्षं पूर्ण झाली आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात