मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तुम्हाला माहीत आहे का, चित्रपटाच्या शुटींगनंतर हिरो-हिरॉईनच्या कपड्यांचं काय होतं?

तुम्हाला माहीत आहे का, चित्रपटाच्या शुटींगनंतर हिरो-हिरॉईनच्या कपड्यांचं काय होतं?

शूटिंगमध्ये (Shooting) अनेक रीटेक वगैरे असतात आणि प्रत्येक सीन सेटपासून कॉस्च्युमपर्यंत डिझाईन करावा लागतो. कारण तुम्ही पाहिले असेल की, एक गाणं शूट करताना अभिनेता वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतो.

शूटिंगमध्ये (Shooting) अनेक रीटेक वगैरे असतात आणि प्रत्येक सीन सेटपासून कॉस्च्युमपर्यंत डिझाईन करावा लागतो. कारण तुम्ही पाहिले असेल की, एक गाणं शूट करताना अभिनेता वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतो.

शूटिंगमध्ये (Shooting) अनेक रीटेक वगैरे असतात आणि प्रत्येक सीन सेटपासून कॉस्च्युमपर्यंत डिझाईन करावा लागतो. कारण तुम्ही पाहिले असेल की, एक गाणं शूट करताना अभिनेता वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतो.

मुंबई, 21 जानेवारी : तुम्हाला माहिती असेलच की, जेव्हा एखादा चित्रपट (Movie Shooting) बनवला जातो, त्यावेळी त्याचे बराच काळ शुटींग चालू असते. शूटिंगमध्ये (Shooting) अनेक रीटेक वगैरे असतात आणि प्रत्येक सीन सेटपासून कॉस्च्युमपर्यंत डिझाईन करावा लागतो. कारण तुम्ही पाहिले असेल की, एक गाणं शूट करताना अभिनेता वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, 3 तासांच्या चित्रपटासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व कपड्यांचे शूटिंग झाल्यावर नेमके काय होते?

कपडे कुठून येतात?

जर आपण टीव्ही कलाकारांच्या (TV Actor) पोशाखांबद्दल बोलत असू तर, त्यांना प्रॉडक्शन हाऊसच्या (Production House) वतीने कपडे दिले जातात. हे कपडे प्रॉडक्शन हाऊस भाड्याने घेऊन अभिनेत्री किंवा अभिनेत्याला देतात. विशेषत: अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे ब्लाउज वैगेरे एका सामान्य आकाराचे असतात आणि ते शूटिंगपूर्वी त्या-त्या अभिनेत्रीच्या साईजनुसार कमी जास्त करून वापरले जातात.

हे वाचा - Health Insurance ठरेल कठीण काळातील मित्र, कोरोना पँडेमिकमध्ये आहे अधिकच महत्त्व; जाणून घ्या फायदे

कपडे परत वापरले जातात?

बहुतेक वेळा कपडे परत वापरले जातात. प्रॉडक्शन हाऊस कपड्यांवर बराच पैसा खर्च करतात आणि शूटिंगनंतरही ते व्यवस्थित ठेवले जातात आणि इतर शुटींगमध्ये वापरले जातात. अनेक वेळा साईड कलाकार नंतर त्या कपड्यांमध्ये दिसतात. म्हणजेच, एकदा शूटिंग झाल्यावर ते कपडे पुन्हा वापरले जातच नाहीत असे नव्हे.

हे कपडे घरी नेले जातात -

असे फार कमी वेळा होत असते. पण, बऱ्याच वेळा अभिनेता किंवा अभिनेत्रीला शूटिंग दरम्यान वापरलेली गोष्ट इतकी आवडते की ते ती सोबत घेऊन जातात. असे अनेक वेळा घडले आहे, जेव्हा अभिनेता किंवा अभिनेत्रीने त्यांना आवडते कपडे किंवा एखादी वस्तू त्यांच्यासोबत घेऊन गेले आहेत.

हे वाचा - पतीविरुद्ध तक्रार नोंदवणारी महिला अडकली पोलीस अधिकाऱ्याच्या प्रेमपाशात, झाली फसवणूक

लिलाव देखील होतात -

अनेक डिझायनर्सचे कपडे डिझायनर त्यांचे ब्रँडिंग म्हणून वापरतात. तसे, अनेक वेळा या खास कपड्यांचा लिलाव केला जातो. आणि जर लोकांना अभिनेत्री किंवा अभिनेत्याने परिधान केलेले कपडे आवडत असतील तर ते त्यांना चांगल्या किंमतीत खरेदीही करतात.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Movie shooting