जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Prevent Sugar Moisture: पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

Prevent Sugar Moisture: पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

Prevent Sugar Moisture: पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

पावसाळ्यात अनेकवेळा घरातील वस्तूमध्ये ओलावा येतो. यात साखरेचा देखील समावेश असतो. साखरेत ओलावा आल्याने (Prevent Sugar Moisture) ती वापरणे त्रासदायक ठरते. त्यामुळे पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून कसे दूर (Protect Sugar From Moisture) ठेवावे याविषयी काही टीप्स माहिती असणे आवश्यक असते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जुलै : पावसाळा (Rainy Season) खूप आनंद घेऊन येणारा ऋतू असतो. अनेकांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा काही गोष्टींमुळे त्रासदायक देखील ठरतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ ओलाव्यामुळे (Moisture In Monsoon) खराब होऊ लागतात. यात साखरेचाही समावेश असतो. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे साखर ओली आणि चिकट (Moisture In Sugar) होऊ लागते. पावसाळ्यात साखर ओली होणे अनेकांसाठी त्रासदायक ठरते. एवढंच नाही तर पावसाळ्यात साखरेमध्ये मुंग्या देखील होऊ लागतात. त्यामुळे अशी साखर वापरता येत नाही आणि काही वेळा ती अधिक खराब (Sakharetil Ardrata) झाल्याने फेकून द्यावी लागू शकते. अशा स्थितीत पावसाळ्यातील या ओलाव्यापासून घरातील साखर (Protect Sugar From Moisture) कशी सुरक्षित ठेवावी याविषयी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्स केवळ साखर ओली (Sakharetil Olava) होण्यापासून वाचवणार नाहीत तर मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यास देखील मदत करतील. या टिप्स वापरून साखरेला ओलाव्यापासून ठेवा दूर  साखरेसोबत ठेवा लवंग : पावसाळ्यात ओलाव्यापासून साखरेला वाचवण्यासाठी साखरेच्या डब्यात सात-आठ लवंगा ठेवा. त्यामुळे साखरेत ओलावा येणार नाही आणि साखरेला मुंग्या देखील होणार नाहीत. तुम्हाला जर लवंग साखरेत उघडी ठेवायची नसेल तर ती सुती कपड्यात बांधून साखरेत ठेवू शकता.

काय सांगता! लोकांना सकाळी झोपेतून उठवण्याच्या कामाचे महिन्याला मिळतात 26 लाख रूपये

साखरेसोबत ठेवा तांदूळ : साखरेतील ओलावा टाळण्यासाठी एका कापडात तांदूळ गुंडाळून साखरेच्या डब्यात ठेवा. हे साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी मदत करेल. तसेच तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यातून साखर काचेच्या बरणीत हलवत असाल तर त्याआधी साखरेत थोडे तांदूळ टाका. हे तांदूळ साखरेमध्ये आधीपासून असलेला ओलावा शोषून घेतील. जेणेकरून साखर काचेच्या बरणीत हलवताना त्यासोबत ओलावा बरणीत जाणार नाही. कितीही भांडलात तरी नातं कधीच तुटणार नाही; प्रत्येक कपलने फॉलो करावेत हे रूल्स काचेच्या भांड्यात ठेवा साखर : बहुतेक लोक अनेक घरगुती वस्तू प्लास्टिकच्या डब्यात किंवा बॉक्समध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु पावसाळा येण्यापूर्वी प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेली साखर काचेच्या बरणीत हलवणे अधिक योग्य ठरते. पावसाळ्याच्या दिवसात प्लास्टिकच्या डब्यात ओलावा येऊ शकतो. त्यामुळे साखर खराब होते. पावसाळ्यात साखर काचेच्या बरणीत ठेवल्यास त्यात मुंग्या येण्याची समस्याही दूर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात