मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काय सांगता! लोकांना सकाळी झोपेतून उठवण्याच्या कामाचे महिन्याला मिळतात 26 लाख रूपये

काय सांगता! लोकांना सकाळी झोपेतून उठवण्याच्या कामाचे महिन्याला मिळतात 26 लाख रूपये

सकाळची साखरझोप अलार्मवर अनेकदा भारी पडते; पण तुम्ही वेळेवर उठून लोकांना झोपेतून उठवून महिन्याला लाखोंची कमाई करू शकता, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर?

सकाळची साखरझोप अलार्मवर अनेकदा भारी पडते; पण तुम्ही वेळेवर उठून लोकांना झोपेतून उठवून महिन्याला लाखोंची कमाई करू शकता, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर?

सकाळची साखरझोप अलार्मवर अनेकदा भारी पडते; पण तुम्ही वेळेवर उठून लोकांना झोपेतून उठवून महिन्याला लाखोंची कमाई करू शकता, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर?

   मुंबई, 30 जून : झोपेतून (Sleep) सकाळी लवकर उठणं अनेकांना आवडत नाही. लवकर उठायचं असेल त्यादिवशी आपण थोड्याथोड्या वेळाचे अलार्म (Alarm) लावून ठेवतो. आपण बऱ्याचदा अलार्म लावूनही वेळेवर उठत नाही. सकाळची साखरझोप अलार्मवर अनेकदा भारी पडते; पण तुम्ही वेळेवर उठून लोकांना झोपेतून उठवून महिन्याला लाखोंची कमाई करू शकता, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर? नक्कीच तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे अगदी खरंय. लोकांना झोपेतून उठवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. त्यामुळे आळस झटका आणि ही पूर्ण बातमी वाचा. एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने (Social Media Influencer) दावा केलाय की तो कोणतीही नोकरी आणि मेहनत न करता लाखो रुपये कमवतोय. त्याला लोकांना चांगल्या पद्धतीने झोपेतून उठवण्यासाठी पैसे मिळतात. जॅकी बोहेम असं या व्यक्तीचं नाव आहे. बोहेमच्या मते तो लोकांना उठायला सांगून महिन्याला 26 लाख रुपये कमावतो. तो त्याच्या रुममध्ये झोपतो आणि तिथूनच तो लोकांना उठायला सांगतो.  या संदर्भात 'झी न्यूज हिंदी'ने हे वृत्त दिलंय.
  कसं करतो काम?
  सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास बोहेम त्याच्या अलार्ममधून पैसे कमवतो. अतिरिक्त पैसे कमवण्यासाठी जॅकी बोहमने एक भन्नाट आयडिया वापरली आणि ती हिट ठरली. आता तो लाखो रुपये कमावतोय. त्याने आपलं बेडरूम लेझर, स्पीकर (Speaker), बबल मशीन (Bubble Machine) आणि इतर अनेक गोष्टींनी भरलं आहे. या सर्व गोष्टी सहज एखाद्याच्या झोपेत अडथळा आणू शकतात. या इंटरॅक्टिव्ह लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून लोक बोहमच्या बेडरूममध्ये ठेवलेली डिव्हाइसेस कंट्रोल करू शकतात. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. बोहेम त्याच्या फॉलोअर्सना उठवण्याच्या बदल्यात पैसे घेतो. थोडक्यात, बोहेम लोकांना झोपेतून उठवण्यासाठी इंटरअ‍ॅक्टिव्ह लाइव्ह स्ट्रिमिंगचा वापर करतो आणि विविध आवाजांमुळे त्याला पैसे देणारे त्याचे ग्राहक झोपेतून जागे होतात. कितीही भांडलात तरी नातं कधीच तुटणार नाही; प्रत्येक कपलने फॉलो करावेत हे रूल्स फॉलोअर्स निवडू शकतात आवडीचं गाणं
  फॉलोअर्स अलार्मसाठी त्यांच्या आवडीचं कोणतंही गाणं निवडू शकतात आणि ते या रुममधील त्रासदायी लाइट शो किंवा इतर गोष्टींसह क्लब करू शकतात. @jakeyboehm नावाच्या या TikToke युजरचे प्लॅटफॉर्मवर 5.2 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. झोपेतून उठवणाऱ्या या व्यक्तीच्या दाव्यावर आपल्याला विश्वास नसला तरी तो यातून चांगली रक्कम कमवतोय, हे मात्र नक्की. दरम्यान, असाच एक व्हिडिओ बोहेमने शेअर केलाय. त्यामध्ये तो अचानक 12:30 वाजता झोपेतून जागा होताना दिसतोय. हा व्हिडिओ 7 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. मिररशी बोलताना बोहेम म्हणाला की, "या प्रयोगाला सुरुवातीला एक सिंगल गिफ्ट आणि साऊंड रिक्वेस्ट म्हणून सुरुवात झाली. आता माझ्याकडे लाईट्स, बबल मशीन, इन्फ्लेटेबल्स, लेझर लाईट्स आणि 20 हून अधिक साऊंड इफेक्ट आहेत. बोहेमची प्रत्येक रात्र सारखीच असते. त्याच्या रुममध्ये दर 10-15 सेकंदांनी साऊंड किंवा लाईट अ‍ॅक्टिव्ह होतात. दरम्यान, 28 वर्षीय बोहेमला यामध्ये आणखी चांगली फीचर अ‍ॅड करायची आहेत, असं त्यानं सांगितलं आहे.
  First published:

  Tags: Money, Sleep

  पुढील बातम्या