Home /News /lifestyle /

कितीही भांडलात तरी नातं कधीच तुटणार नाही; प्रत्येक कपलने फॉलो करावेत हे रूल्स

कितीही भांडलात तरी नातं कधीच तुटणार नाही; प्रत्येक कपलने फॉलो करावेत हे रूल्स

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

नात्यांमधील गुंता अलवारपणे सोडवून नाती टिकवण्यासाठी (Relationship Tips) काही सोप्या टिप्स जाणून घ्या.

मुंबई, 30 जून : व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे एकमेकांच्या सगळ्याच गोष्टी पटू शकत नाहीत. कितीही समविचारी लोक एकत्र आले, तरी त्यांच्यात वाद होऊ शकतात. मग लग्नानंतर तर अनेकदा अपरिचित दोन व्यक्ती अचानकपणे एकत्र नांदू लागतात. तिथे असे वाद अपरिहार्य असतात; पण याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी हे आवश्यकच असतं. कधीकधी वाद विकोपाला जातात आणि घटस्फोटापर्यंत प्रकरण जातं. नात्यांमधील गुंता अलवारपणे सोडवून नाती टिकवण्यासाठी (Relationship Tips) काही सोप्या टिप्स जाणून घ्या. यामुळे जोडीदाराचं मन जिंकण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. जोडीदाराची आवड-निवड समजून घ्या नवीन लग्न झालेलं जोडपं एकत्र राहू लागल्यावर एकमेकांविषयी त्यांना खरं जाणून घेता येतं. मात्र याच काळात अनेक जोडप्यांमध्ये छोटी छोटी भांडणं होतात. प्रेम, अपेक्षा आणि वास्तव यांच्यातले फरक दिसायला लागतात. त्यातून मन अस्वस्थ होतं आणि जोडीदारावर राग काढला जातो. ही छोटीछोटी भांडणं होऊ नयेत, जोडीदार आनंदी राहावा असं वाटत असेल, तर जोडीदाराची आवड-निवड समजून घ्या. त्यांना काय आवडतं, काय हवं आहे, जोडीदाराला काय खायला आवडतं, कुठे फिरायला आवडतं हे समजून (Understand Your Partner) घ्या. हे वाचा - Shopping चंही असतं 'शास्त्र'; कधी काय खरेदी करायचं आणि काय नाही वाचा सविस्तर आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी करायला आवडत नाहीत, हेही माहीत करून घ्या. म्हणजे तुम्ही जोडीदाराला खूश ठेवू शकाल. जोडीदाराचं कौतुक करण्याची संधी कधीही सोडू नका. यामुळे एकमेकांच्या मनातलं स्थान आणखी दृढ होतं. शॉपिंग आणि डिनरला घेऊन जा आपला जोडीदार आपल्यासाठी खास आहे, याची जाणीव त्याला किंवा तिला व्हायला हवी. त्यासाठी जोडीदाराला वेळ द्या. कधी शॉपिंगला घेऊन जाऊन मनसोक्त खरेदी करा, तर कधी डिनरला जाण्याचा प्लॅन (Plan Dinner For Partner) करा. कधी कँडल लाइट डिनरला पार्टनरला घेऊन जा. अगदी सुट्टी काढून कधीतरी फिरायला जाण्याचा विचारही करू शकता. असं केल्यानं तुमच्या दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळेल. दैनंदिन आयुष्यात नोकरी, घर यातून थोडं वेगळं रूटीन होईल. ते नक्कीच जोडीदाराला आवडेल. जोडीदाराचं बोलणं ऐकून घ्या कधीकधी समोरचा काही सांगत असतो आणि आपलं लक्षच नसतं. असं वारंवार व्हायला लागलं, की समोरचा सांगणंच बंद करतो. मग नात्यांमध्ये कडूपणा येतो. वाईट वाटतं. आपल्या जोडीदाराच्या बाबतीत असं होऊ द्यायचं नसेल, तर त्याचं-तिचं बोलणं नीट ऐकून (Listen To Your Partner Carefully) घ्या. दोघांचं बोलणं सुरू असताना दुर्लक्ष करू नका. जोडीदाराला काय सांगायचं आहे, त्याची-तिची काय इच्छा आहे हे समजून घ्या. त्यामुळे नातं टिकून राहण्यासाठी मदत होईल. हे वाचा - Travel Tips : कॉलेज स्टुडंट आहात? मित्रमंडळींसोबत एन्जॉय करायचंय? ट्राय करा हे टुरिस्ट स्पॉट्स प्रेम दिल्यानं प्रेम मिळतं, असं म्हणतात. जोडीदारासोबतच्या नात्याचा तर प्रेम हाच पाया असतो. म्हणूनच एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. यानंच नात्यांमधला गोडवा जपला जातो.
First published:

Tags: Couple, Lifestyle, Relationship

पुढील बातम्या