मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Life Experiences : 'कुछ तो लोग कहेंगे'; लोकांचं सोडा, चांगलं आयुष्य जगण्यासाठी या गोष्टींवर करा फोकस

Life Experiences : 'कुछ तो लोग कहेंगे'; लोकांचं सोडा, चांगलं आयुष्य जगण्यासाठी या गोष्टींवर करा फोकस

आपल्याला आपल्या बद्दल लोक काय बोलत आहेत, याची फार उत्सुकता असते. लोक जर आपल्याबद्दल चांगलं बोलत असतील तर आपल्याला फार मजा येते आणि जर तेच लोक आपल्याला मागे अथवा आपल्या तोंडावर आपल्यावर टीका करत असतील तर आपल्याला लगेच वाईट (Stress) वाटायला लागते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 : आपल्याला आपल्याबद्दल लोक काय बोलत आहेत, याची फार उत्सुकता असते. लोक जर आपल्याबद्दल चांगलं बोलत असतील तर आपल्याला फार मजा येते आणि जर तेच लोक आपल्याला मागे अथवा आपल्या तोंडावर आपल्यावर टीका करत असतील तर आपल्याला लगेच वाईट (Stress) वाटायला लागते. त्यामुळे आपल्यात नकारात्मक भाव तयार व्हायला लागतो. परंतु आपण कधी लोकांचं का आणि कशाला मनावर घेत आहोत याचा विचार मात्र करत नाही. त्यामुळे आता आपल्याला 'कुछ तो लोग कहेंगे' या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी आठवून हे सगळं (life experiences) विसरावं लागणार आहे. कारण या विषयामुळे लोकांना येत असलेला तणाव आणि त्यातून तयार होणाऱ्या न्यूनगंडाच्या भावनेमुळे लोकांना मानसिक (stress management) तणावाला सामोरं जाव लागत असल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

लंडन (London) शहरातील प्रसिद्ध दैनिक ‘द मिरर’ (The mirror) मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत काही गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे आता आपल्याला येणाऱ्या तणावामुळे (mental reaction to life experiences) आणि लोक काय म्हणतील, या आपल्या समजावर लोकांना पुनर्विचार करावा लागणार आहे. लोकांवर करण्यात आलेल्या या संशोधनात जेव्हा लोकांना याबाबत विचारण्यात आलं की तुमच्या आयुष्यात या गोष्टींचा काय फरक होत आहे का तर त्यावर 10 पैकी 4 लोकांनी नकारात्मक उत्तरं दिली आहे. त्यापैकी काही लोक या विषयावर बोलण्यास नकार देत आहे कारण हा विषय मानसिक तणावाचा असल्याने लोकांना या विषयावर बोलणंही कठिण झालं आहे.

Heart Attack : व्यायाम हवाच पण किती वेळ? जास्त व्यायाम केल्याने वाढतो हार्ट अटॅकचा धोका

या संशोधनात या विषयावर फार कमी लोक व्यक्त होताना दिसले कारण त्यातील काही लोकांना असं वाटतं की आपण यावर उघडपणे बोललो तर लोक आपल्याला काय म्हणतील. त्याचबरोबर आपल्याला येत असलेल्या या समस्यांवर आपण बोललो तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील हा ही नकारात्मक भाव लोकामध्ये या संशोधनातून पाहायला मिळाला.

आपके हसीं पैर... पावसाळ्यात काळजी घेतली नाहीत तर असतो Infection चा धोका

कोरोनाकाळात लोकांना झालेल्या मानसिक आणि आरोग्यविषयक नुकसानामुळे लोकांवर याचा किती प्रभाव पडला आहे, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. त्यामुळे आता लोकांच्या मताचा प्रभाव हा व्यक्तिंच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असल्याने आता लोकांना आपल्याबद्दल असलेल्या इतरांच्या मताला विचारात न घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

First published:

Tags: Health Tips, Personal life, Stress