Home /News /lifestyle /

Alia Bhatt Pregnant : 'दीड वर्षातच आलिया-रणबीर...'; कपलने Good News देताच ज्योतिषांनी केली मोठी भविष्यवाणी

Alia Bhatt Pregnant : 'दीड वर्षातच आलिया-रणबीर...'; कपलने Good News देताच ज्योतिषांनी केली मोठी भविष्यवाणी

आलिया-रणबीर (Alia and Ranbir) या गुड न्यूजमुळे प्रचंड खूश आहेत. त्यामुळे आता बॉलीवूड इंडस्ट्रीतील हे पॉवर कपल (Bollywood couple) कशा प्रकारचे पालक सिद्ध होतील? त्यांना किती मुलं असतील? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जून : बॉलिवूडमधील मोस्ट क्यूट कपल आलिया भट (Alia Bhatt pregnant) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी नुकतीच गुड न्यूज (Good News) दिली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपल्या प्रेग्नंसीची (Alia Pregnancy) माहिती दिली आहे. यानतंर त्यांचे मित्र परिवार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशात ज्योतिषांनी या कपलबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील हे पॉवर कपल (Bollywood couple) कशा प्रकारचे पालक सिद्ध होतील? त्यांना किती मुलं असतील? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत आहेत. सेलिब्रिटी ज्योतिषी भाविक संघवी (Bhavik Sanghvi) यांनी यासंदर्भात काही भाकित केले आहेत. ज्योतिषी भाविक यांनी सांगितले की, आलिया आणि रणबीर यांच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्टीकोणातून दोघांसाठी पालक बनण्याची ही योग्य वेळ आहे. रणबीरला वडील होण्यासासाठी 2023 म्हणजे थोडा उशीरच झाला आहे. मात्र जे झाले जे उत्तम आहे. कपूर कुटुंबाच्या विस्तारासाठी देखील ही योग्य वेळ आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (Alia-Ranbir) हे बॉलीवूडचे सामान्य पालक असतील, ते आपल्या मुलाचे खूप लाड करतील. करिना आणि सैफ याचे मुलं तैमूर आणि जेह यांच्याप्रमाणेच आलिया-रणबीरचे मूलही लोकप्रिय होईल. Tamarind leaf Tea: चिंचेच्या पानांचा चहा कधी घेतलाय का? हे फायदे समजल्यावर नक्की घ्याल भाविक यांनी आलिया-रणबीरला दोन मुले होतील असे भाकित केले आहे. परंतु आधी मुलगा होईल की मुलगी हे सांगणे खूप घाईचे असेल असे ते म्हणतात. कुंडलीनुसार त्यांना एक मुलगी आणि मुलगा होण्याचे योग आहेत आणि कोणत्याही पालकांसाठी हे गुड कॉम्बिनेशन मानले जाते. भाविक यांच्या मते यावेळी त्यांना मुलगी झाली तर पुढचा मुलगा असेल. विशेष बाब म्हणजे 2024 अखेपर्यंत आलिया दुसऱ्या प्रेग्नेंसीची बातमी देऊ शकते असेही भाकित भाविक यांनी केले आहे. दीड वर्षात हे जोडपं दुसरी गुड न्यूज देऊ शकते असे भाकित भाविक यांनी व्यक्त केले आहे. Healthy Life: निरोगी जीवनासाठी आजपासूनच या 8 सवयी लावून घ्या; कोणत्याही वयात राहाल तंदुरुस्त आलिया रणबीरबद्दल केलेल्या या भाकितांमागे त्यांनी संख्याशास्त्रीय कारण असल्याचे सांगितले आहे. आलियाची जन्मतारीख 15 मार्च 1993 आहे. म्हणून तिचा जन्मांक 6 आहे आणि शुक्राचे राज्य आहे. तर रणबीर कपूरची जन्मतारीक 28 सप्टेंबर 1982 आहे, त्याची रास तूळ आहे आणि शुक्राचे राज्य आहे. या पती-पत्नी दोघांमध्ये 6 हा आकडा कॉमन आहे. शुक्र अंक असलेले लोक प्रेम, सौहार्द, महागड्या कार, लक्झरी लाईफ जगणारे असतात. हे आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतात. येणार्‍या पिढीवर ते आपली सर्व संपत्ती समर्पित करतात.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Alia Bhatt, Good news, Lifestyle, Ranbir kapoor

    पुढील बातम्या