जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Healthy Life: निरोगी जीवनासाठी आजपासूनच या 8 सवयी लावून घ्या; कोणत्याही वयात राहाल तंदुरुस्त

Healthy Life: निरोगी जीवनासाठी आजपासूनच या 8 सवयी लावून घ्या; कोणत्याही वयात राहाल तंदुरुस्त

Healthy Life: निरोगी जीवनासाठी आजपासूनच या 8 सवयी लावून घ्या; कोणत्याही वयात राहाल तंदुरुस्त

चांगला आहार आणि हलका व्यायाम तुमचे मन आणि शरीर दोन्ही दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. तुम्हाला असे वाटत असेल की, म्हातारे झाल्यावरही आपण सक्रिय जीवन जगावे आणि निरोगी राहावे, तर आजपासूनच तुमच्या सवयींमध्ये काही बदल करा.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जून : जर तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहायचे असेल आणि शरीराला आजारांपासून दूर ठेवायचे असेल, तर लहानपणापासूनच जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. वास्तविक, जेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात निरोगी आहार, सक्रिय जीवनशैली, तणावमुक्त मन आणि सकारात्मकता समाविष्ट करतो, तेव्हा आपल्या शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून (Habits To Stay Healthy) येतात. MyClinicGroup च्या मते, चांगला आहार आणि हलका व्यायाम तुमचे मन आणि शरीर दोन्ही दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. तुम्हाला असे वाटत असेल की, म्हातारे झाल्यावरही आपण सक्रिय जीवन जगावे आणि निरोगी राहावे, तर आजपासूनच तुमच्या सवयींमध्ये काही बदल करा. दररोज व्यायाम करा - रोज व्यायाम केल्यास शरीराला त्याची सवय होईल आणि हळूहळू शरीराच्या अवयवांची ताकद वाढेल. आठवड्यातून 3 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि 2 दिवस कार्डिओ ट्रेनिंग करण्याचे तुमचे ध्येय बनवा. आठवड्यातून 2 दिवस विश्रांतीसाठी ठेवू शकता. शरीराचे वजन राखणे - वाढत्या वयाबरोबर शरीराचे वजनही वाढू लागते आणि त्यामुळे शरीरात अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे वजन सांभाळा. नेहमी अ‌ॅक्टीव रहा - तुमचे शरीर जितके सक्रिय असेल तितके तुम्ही तंदुरुस्त राहाल. यासाठी प्रत्येक वेळी स्वतः काम करण्याचा प्रयत्न करा. घरकाम करा, खेळ खेळा, चालणे इत्यादी गोष्टी करत राहा गोड पदार्थ नको - गोड पदार्थ तुमच्या शरीरासाठी हानिकारक असतात. ते तुमच्या त्वचेवर लवकर वृद्धत्व आणतात आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अनेक आजारही होऊ शकतात. चांगली चरबी - आपल्याला खराब चरबीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात चांगल्या चरबीयुक्त पदार्थांचा वापर करा. यासाठी ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या गोष्टींचे सेवन करावे. फळे आणि भाज्या खा - शक्यतो आहारात हंगामी फळे आणि हिरव्या भाज्या खा. ते तुमच्या शरीरातील अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादींची कमतरता भरून काढण्यास मदत करतात आणि तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी ठेवतात. हे वाचा -  Causes of Dizziness: बसून उठल्यानंतर अचानक चक्कर का येते? तज्ज्ञांनी सांगितली 3 मोठी कारणं जास्त पाणी प्या - तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमचे शरीर निरोगी राहील. वास्तविक, शरीरात 75 टक्क्यांहून अधिक पाणी असते, ज्यामुळे शरीर आणि त्वचा लवचिक बनण्यास मदत होते. हे वाचा -  Childhood Obesity: तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय रात्रीची चांगली झोप - रात्रीची 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही कमी झोपत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि तुम्हाला थकवा जाणवेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात