जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pregnancy Tips : प्रेग्नन्सीत झोपण्याची योग्य पद्धत कोणती? कोणत्या कुशीवर झोपणे जास्त फायदेशीर

Pregnancy Tips : प्रेग्नन्सीत झोपण्याची योग्य पद्धत कोणती? कोणत्या कुशीवर झोपणे जास्त फायदेशीर

प्रेग्नन्सीत झोपण्याची योग्य पद्धत कोणती?

प्रेग्नन्सीत झोपण्याची योग्य पद्धत कोणती?

गर्भवती महिलेला गर्भधारणेदरम्यान झोपण्याची योग्य पद्धत, स्थिती काय असावी हे माहित असले पाहिजे. यामुळे तुम्हाला रात्री झोपताना कोणतीही अस्वस्थता, वेदना जाणवणार नाही आणि आरामदायी झोपही मिळेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 नोव्हेंबर : गरोदरपणात महिला ज्या प्रकारे आपल्या आहाराची विशेष काळजी घेतात, त्याचप्रमाणे पुरेशी विश्रांती आणि झोप घेणेही याकाळात आवश्यक आहे. विशेषतः, प्रत्येक गर्भवती महिलेला गर्भधारणेदरम्यान झोपण्याची योग्य पद्धत, स्थिती काय असावी हे माहित असले पाहिजे. यामुळे तुम्हाला रात्री झोपताना कोणतीही अस्वस्थता, वेदना जाणवणार नाही आणि आरामदायी झोपही मिळेल. गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या महिन्यात, विशेषतः महिलांनी अंथरुणावर योग्य स्थितीत झोपणे आवश्यक असते. जेणेकरुन जन्मलेल्या बाळाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. गरोदरपणात झोपण्याची योग्य पद्धत कोणती? त्याचबरोबर कोणत्या महिन्यात कोणती झोपण्याची पद्धत आकाशी योग्य हेदेखील आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Pregnancy Tips : गरोदरपणात भात खावा की नाही? White की Brown कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर

गरोदरपणात झोपण्याची योग्य पद्धत मॉमजंक्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, प्रामुख्याने तीन झोपण्याच्या पोझिशन्स आहेत, डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपणे, पाठीवर झोपणे आणि पोटावर झोपणे, परंतु या तीन झोपण्याच्या पोझिशन्सपैकी गर्भधारणेच्या तिमाहीत कोणती पोझिशन म्हणजेच पद्धत सर्वात चांगली आणि आरामदायक आहे? जाणून घ्या.

News18लोकमत
News18लोकमत

पहिल्या तिमाहीत झोपण्याची योग्य पद्धत गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत, गर्भाशयाचा आकार फार मोठा नसतो, म्हणून या तिमाहीत म्हणजेच 1 ते 3 महिन्यात तुम्ही तीनही पद्धतीने झोपू शकता. मात्र फार वेळ पोटावर झोपणे टाळावे. कोणत्याही पद्धतीने झोपणे शक्य असले तरीदेखील आपण आपल्या उजव्या अंगावर म्हणजेच उजव्या बाजूला तोंड करून झोपल्यास आपल्याला अधिक आरामदायक वाटेल. दुसऱ्या तिमाहीत झोपण्याची योग्य पद्धत गरोदरपणाच्या 4 ते 6 महिन्यांत पोटावर झोपणे टाळावे. तुम्हाला पोटावर झोपल्याशिवाय झोप येत नसेल तर तुम्ही 16 आठवडे असे झोपू शकता, पण त्यानंतर चुकूनही या स्थितीत झोपू नका. चौथ्या महिन्यात पोटाचा आकार वाढतो, त्यामुळे पोटावर झोपल्याने गर्भाशय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव येतो. तसेच दुसऱ्या तिमाहीपासून पाठीवर झोपणेदेखील बंद करा. पाठीवर झोपल्याने गर्भाशय शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांना रोखू शकते. या स्थितीत बाळाला रक्तपुरवठ्यात अडचणी येऊ शकतात आणि प्लेसेंटा देखील विस्कळीत होऊ शकते. यामुळे तुम्हाला चक्कर येणे, मळमळ, उलट्या, श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू शकतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत सर्वोत्तम स्थिती म्हणजे एका बाजूला झोपणे. विशेषत: 20 व्या आठवड्यापासून या स्थितीत झोपायला सुरुवात करावी.

Pregnancy tips in marathi : गरोदरपणात महिलांनी मायक्रोवेव्ह वापरणे सुरक्षित आहे का?

तिसऱ्या तिमाहीत झोपण्याची योग्य पद्धत तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच 7 ते 9 महिन्यात तुम्ही फक्त एका बाजूला विशेषतः डाव्या कुशीवर झोपावे. एका कुशीवर झोपल्याने तुमच्या नसा आणि अविभाज्य अवयवांवर कमी दाब पडतो. तर डाव्या बाजूला झोपल्याने रक्त आणि पोषक घटक वाढण्यास मदत होते, जे प्लेसेंटा आणि तुमच्या बाळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे गरोदरपणाच्या तीनही तिमाहींमध्ये तुमच्या झोपण्याच्या स्थितीची विशेष काळजी घ्या. दररोज योग्य झोप घ्या. गर्भवती महिलेने किमान 8 तास झोप घेणे आवश्यक असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात