मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pregnancy tips in marathi : गरोदरपणात महिलांनी मायक्रोवेव्ह वापरणे सुरक्षित आहे का?

Pregnancy tips in marathi : गरोदरपणात महिलांनी मायक्रोवेव्ह वापरणे सुरक्षित आहे का?

अन्न लवकर शिजवण्यासाठी आणि झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह जितकं फायद्याचं आहे, तितकंच ते हानिकारकही आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी तर याबाबत अधिकच काळजी घ्यायला हवी.

अन्न लवकर शिजवण्यासाठी आणि झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह जितकं फायद्याचं आहे, तितकंच ते हानिकारकही आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी तर याबाबत अधिकच काळजी घ्यायला हवी.

अन्न लवकर शिजवण्यासाठी आणि झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह जितकं फायद्याचं आहे, तितकंच ते हानिकारकही आहे. विशेषतः गर्भवती महिलांनी तर याबाबत अधिकच काळजी घ्यायला हवी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 24 सप्टेंबर : ऋतू कोणताही असो आपणा सर्वाना गरम गरम अन्न पदार्थ खायला आवडतात. कोणत्याही मेहनतीशिवाय अगदी झटपट पदार्थ गरम करायचे असतील तर त्याला पर्याय म्हणजे मायक्रोवेव्ह. आता बहुतेक घरांमध्ये घरात मायक्रोवेव्ह असणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. यामुळे आपण अन्न लवकर शिजवू शकता, अन्न गरम करू शकता, दूध उकळू शकता. इतकंच नाही तर घरी बसून सिनेमा पाहताना पॉपकॉर्नचा आस्वादही घेता येतो. याचे फायदे खूप आहेत तितकेच नुकसानही आहे.

होय, मायक्रोवेव्ह ओव्हनच्या सुविधेइतकेच नुकसानदेखील आहे. मायक्रोवेव्हच्या वापरामुळे कधी कधी आरोग्याला इतके नुकसान होऊ शकते की, अनेक देशांनी त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. विशेषतः गरोदर महिलांवर याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्हाला माहित आहे का?  आज आम्ही तुम्हाला मायक्रोवेव्हच्या वापराने प्रेग्नंट महिलांवर काय परिणाम होऊ शकतात याबद्दल माहिती देणार आहोत.

Pregnancy Tips in Marathi : गरोदरपणात जबरदस्त औषध आहे हा ज्युस; प्रेग्न्सीतील सर्व समस्या होतील दूर

E Times ने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोवेव्हमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी लीक झाल्यास, त्याच्या थोड्याशाही संपर्काने आईच्या गर्भातील बाळावर परिणाम होऊ शकतो. हे रेडिएशन अदृश्य असतात, ज्यामुळे त्याचे परिणाम पाहणे आणि समजणे शक्य होत नाही. जर तुमचा मायक्रोवेव्ह जुना असेल किंवा त्याचा दरवाजा नीट लोक होत नसेल. तर त्यातून या लहरी थेट बाहेर येतात आणि 12 सेमी पर्यंत पोहोचू शकतात. मग याचा गर्भावर वाईट परिणाम होतो.

गर्भवती महिलांनी मायक्रोवेव्ह वापरताना घ्यावी ही खबरदारी

- मात्र जर आपण मायक्रोवेव्ह ओव्हन योग्य प्रकारे वापरले. तर ते गर्भाला कोणतीही हानी पोहोचवू शकत नाही. कारण ते जास्त रेडिएशन उत्सर्जित करत नाही. फक्त या लहरी बाहेर पडल्यास सावधगिरी बाळगावी आणि डिव्हाइस बंद करावे. जर तुम्ही उरलेले अन्न पुन्हा गरम करत असाल तर ते जास्त गरम करू नका, यामुळे लहरी उत्सर्जित होण्याची शक्यता वाढते.

- जर मायक्रोवेव्ह ओव्हनचा दरवाजा नीट लॉक होत नसेल. तर तुम्ही ते मायक्रोवेव्ह न वापरणेच योग्य ठरेल. मायक्रोवेव्हमधून उत्सर्जित होणाऱ्या या लहरी शोधणे कठीण काम आहे. त्यामुळे मायक्रोवेव्ह जुना झाला असेल तर तो बदलनेच योग्य. तसेच शक्यतो गर्भधारणेदरम्यान स्वतः मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवणे किंवा बेक करणे पूर्णपणे टाळणे चांगले आहे.

आलियाच्या बेबी शॉवरमध्ये असणार Vegan Food, पाहा गरोदरपणात व्हीगन डाएट फायदेशीर आहे का?

- मायक्रोवेव्हमध्ये स्वयंपाक करणे सुरक्षित आहे, परंतु ते वापरताना त्यापासून लांब उभे राहणे चांगले, यामुळे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा संपर्क टाळण्यास मदत होईल. तसेच स्क्रॅच असलेल्या जुन्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा मायक्रोवेव्ह कंटेनरमध्ये अन्न शिजवणे किंवा बेक करणे टाळा, यामुळे अन्नामध्ये रसायनांची गळती होते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman