मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बेबी प्लॅनिंग करताय? आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्या मगच करा प्रेग्न्सीचा विचार कारण...

बेबी प्लॅनिंग करताय? आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्या मगच करा प्रेग्न्सीचा विचार कारण...

संशोधनानुसार आहार आणि फर्टिलिटी यांचा जवळचा संबंध असतो.

संशोधनानुसार आहार आणि फर्टिलिटी यांचा जवळचा संबंध असतो.

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच प्रेग्नन्सीचा विचार करण्याचा सल्ला सरकारकडून दिला जात आहे.

    नवी दिल्ली, 10 जुलै : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) सुरू केलं आहे. या वयोगटाला रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप (Reproductive Age Group) असं संबोधलं जातं. या गटातील बहुतांश नागरिकांचं लग्न झालंल आहे किंवा ते लग्न करण्याच्या तयारीत आहेत आणि बेबी प्लॅनिंगचाही विचार करत आहेत. त्यामुळे या गटातल्या लोकांमध्ये लशीबाबत (Corona Vaccine) अनेक शंका आहेत.

    लशीमुळे वंध्यत्व येतं असा या गटातील नागरिकांचा गैरसमज आहे. याशिवाय लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच प्रेग्नसीचा सल्ला सरकारकडून दिला जात आहे. मात्र लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर प्रेग्नसीच्या केसेस दिसून येत आहेत. अशा वेळी काय करायचं? प्रजनन आणि गर्भधारणेसंबंधी बऱ्याच मुद्द्यांबाबत सफदरजंग हॉस्पिटलच्या नवजात बालरोग तज्ज्ञ आणि कोविड 19 नोडल अधिकारी आणि महिला प्रसूतिशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुमित्रा बानी यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

    प्रश्न - कोरोना लसीकरणाचा खरोखरच प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो की अन्य कोणत्याही लसीमध्ये असा परिणाम होणे शक्य आहे?

    उत्तर - यूएसमध्ये भारतापूर्वी जवळपास 16 दिवस आधी म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये कोविड लसीकरण (Covid Vaccination) सुरू झालं. तिथं याबाबत एक संशोधन केलं गेलं. यात महिलांवर लसीकरणानंतर होणारा परिणाम अभ्यासला गेला. या संशोधनातील अनेक महिला लसीकरणानंतर प्रेग्नंट राहिल्या. याचा आधार घेता, लस घेतल्यानंतर प्रजनन क्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नसल्याचं स्पष्ट होतं. कोविड लसच नाही तर अन्य कोणतीही लस घेतल्यानंतर असा परिणाम दिसून आलेला नाही. आपल्या सर्वांना लहानपणीच संभाव्य आजारांपासून संरक्षण व्हावं यासाठी विविध लशी दिल्या जातात. कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या लसीकरणाचा असा कोणताही परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही.

    हे वाचा - बेबी प्लॅनिंग करताय; हेल्दी प्रेग्नन्सीसाठी योग्य वय कोणतं माहिती आहे?

    खरंतर लस शरीरात विषाणूविरोधी कवच तयार करते. याचा अन्य कोणत्याही क्रिया किंवा प्रतिक्रियेवर परिणाम होत नाही. कोविड लस घेतलेली महिला जर गर्भवती राहिली तर ती आपल्या बाळाला अँटिबॉडी (Antibodies) देऊ शकते. यामुळे नवजात शिशुचे संसर्गापासून रक्षण होईल.

    प्रश्न – कुटुंब नियोजनाचे पर्याय (आयपिल्स, गर्भनिरोधक आदी) अवलंबल्यानंतर कोविड लस घेता येते का?

    उत्तर – आमच्या ओपीडीत अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन दाम्पत्य येत असतात. आम्ही कुटुंब नियोजन करू इच्छितो किंवा आम्ही सध्या कुटुंब नियोजन करू इच्छित नाही, यापैकी एक काही तरी ते सांगतात. काही जण ओरल कॉन्ट्रासेप्टीव्ह (Contraceptive) घेत असतात. या स्थितीत कोविड लस घेऊ शकतो का, असं ते विचारतात. या विषयाच्या अनुषंगाने दोन गोष्टी स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही लस घेतली आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विस्तार करु इच्छित असाल तर त्यामुळे गर्भातील शिशुलाही संरक्षण मिळेल. दुसरी गोष्ट अशी की कुटुंब नियोजनासाठी ज्या पिल्स (Pills) घेतल्या जातात, त्यात अत्यंत अल्प प्रमाण स्टेरॉईड असतं, मात्र हे नुकसानकारक नसतं.

    हे वाचा - अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती

    गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी सरकारने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या माध्यमातून गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लसी या गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहेत.

    प्रश्न – कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधले अंतर 84 दिवसांचं आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर गर्भधारणेचा विचार करू शकतो का?

    उत्तर – कोविड संसर्गाविरुद्ध एक आदर्श स्थिती निर्माण होण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच गर्भधारणेचा विचार केला पाहिजे. मात्र तरीही एक डोस घेतल्यानंतर नकळत गर्भधारणा झाली तरी नियोजित वेळेनुसार लशीचा दुसरा डोस घेता येतो. यामुळे गर्भातील बालकाला संरक्षण मिळतं. परंतु तुम्ही जागरूक दाम्पत्य असाल आणि नियोजन करून कुटुंब विस्तार करणार असाल तर लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर गर्भधारणा ही आदर्श स्थिती ठरू शकते. यामुळे आई आणि बाळाला पुरेशा प्रमाणात अँटिबॉडी उपलब्ध होऊ शकतात. जर तुम्ही कोवॅक्सिन लस घेतली असेल तर 28 दिवसांनंतर दुसरा डोस घेतल्यावर गर्भधारणेचा विचार करता येऊ शकतो.

    प्रश्न – पीसीओएस (पॉलिसिस्टीक ओवेरियन सिंड्रोम) किंवा यूटीआय (युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन) या समस्या असतील तर अशा स्थितीत लस केव्हा घेतली पाहिजे?

    उत्तर – उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयविकार असल्यास तातडीने लस घेणं आवश्यक आहे. ज्या महिलांना हे विकार आहेत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर तो गंभीर रुप धारण करू शकतो. याचप्रमाणे पीसीओएस (PCOS) आणि यूटीआय झालेल्या महिलांनी आजार नियंत्रणात असेल, कोणताही धोका नसेल तर लस घेतली पाहिजे. जर एखादा रुग्ण गंभीर अॅलर्जीने त्रस्त असेल, त्यास इम्युनो सप्रेंट औषधं सुरू आहेत किंवा यूटीआयमुळे (UTI) एखाद्या रुग्णास तीव्र ताप आहे, त्वचेचा काही गंभीर विकार आहे अशा स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेता येऊ शकते.

    प्रश्न – पीरियड्स दरम्यान लस घेता येते का?

    उत्तर – हो, अगदी घेता येते. याबाबत मनात कोणताही संभ्रम नको. लस ही पूर्णतः सुरक्षित असून महिला पीरियड्स दरम्यानही लशीचा डोस घेऊ शकतात.

    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Covid-19, Pregnancy, Vaccination, Vaccine