मुंबई, 09 जुलै : सध्याच्या काळात लोक जबाबदारी पेलण्यास सक्षम असतील तर त्यानुसार कुटुंब नियोजन (Family Planning) करतात. परंतु कुटुंब नियोजनामध्ये वय हा घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. स्त्रीची गर्भावस्था (Pregnancy) कधी आणि कशी असावी, यासाठी पुरुष आणि महिलेचं वय महत्त्वाचं असते जसजसं महिलांचं वय वाढतं. तसतसं त्यांच्या प्रजननक्षमतेवर (Fertility) परिणाम होतो शिवाय प्रेग्नन्सीतील समस्या आणि बाळ, आईच्या आरोग्याच्या समस्यांचा धोकाही वाढतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या वयापरत्वे महिला आणि पुरुषांची प्रजननक्षमता एकमेकांच्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करते. महिलांमध्ये बीजांडांची संख्या मर्यादित होते. ही सर्व बीजांडं अंडाशयात असतात. वाढत्या वयासोबत पुरुषांच्या तुलनेत महिलांची प्रजनन क्षमता झपाट्याने कमी होते, असं यावरून दिसतं. या टप्प्यात काही प्रमाणात नुकसानदेखील होऊ शकतं. पहिल्या गर्भधारणेदरम्यान प्री-एक्लेमप्सियाचा (प्रेग्नसीमधील एक प्रकारचा अडथळा) धोका अधिक असतो. एखाद्या महिलेला पीसीओडी (PCOD) किंवा गर्भाशयाचा काही आजार असेल, तर गर्भावस्थेत समस्या निर्माण होतात. त्यामुळे योग्य वयातच गर्भधारणा होणं आरोग्यासाठी चांगलं असतं.
हे वाचा - OMG! 9 नाही तर 15 महिन्यांचं बाळ; तब्बल 16 तासांनंतर आईच्या पोटातून आलं बाहेर
महिलांना सामान्यपणे वयाच्या 45 मध्ये रजोनिवृत्ती येते. म्हणजे त्यांची मासिक पाळी थांबते. मासिक पाळी थांबणं म्हणजे महिलांची प्रेग्नन्सीची शक्यता संपणं. पण विशी, तिशी आणि चाळीशीत महिलांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत जातो आणि वाढत्या वयानुसार त्यांची प्रजनन क्षमता कमी होत जाते.
विशीतील प्रेग्नन्सी
महिला वयाच्या विशीत सर्वाधिक प्रजननक्षम (Fertile) असतात. या काळात सुलभपणे गर्भधारणा होऊ शकते. वयाच्या विशी-एकविशीत गर्भधारणा झाल्यास त्याचे अनेक फायदे आहेत, असं तज्ज्ञ सांगतात. या कालावधीत महिलांच्या बीजांडांमध्ये कोणतीही आनुवंशिक विकृती नसते. त्यामुळे होणाऱ्या बाळात डाउन सिंड्रोमसारखे (Down Syndrome) अन्य जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता कमी असते. तसंच या कालावधीत गर्भपाताचा धोका, वेळेपूर्वी प्रसूती, जन्मावेळी बाळाचं वजन प्रमाणापेक्षा कमी असणं अशा समस्या उद्भवण्याची शक्यतादेखील कमी असते. या वयात आईला गेस्टेशनल डायबेटीस, उच्च रक्तदाब किंवा आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका खूपच कमी असतो.
तिशीती प्रेग्नन्सी
आयुष्याच्या तिशीच्या टप्प्यात एखादी महिला गर्भधारणा करू इच्छित असेल, तर तिची गर्भधारणेची शक्यता 15 ते 20 टक्के प्रतिमहिना असते. संबंधित महिलेला गंभीर आजार असेल तर ही शक्यता अजून कमी होते. 35 व्या वर्षी महिलांमधील गर्भधारणेची क्षमता नैसर्गिकरित्या कमी होते. यामागे बीजांडांची (Eggs) संख्या आणि त्यांचा घसरलेला दर्जा आदी कारणं असू शकतात. या वयात गर्भधारणा झाल्यास अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यात सिझेरियन किंवा सी-सेक्शन पद्धतीने प्रसूती होण्याची शक्यता अधिक असते. नवजात बालकाला आनुवंशिक समस्यांचा धोका अधिक असतो. तसंच, अशा महिलांना गर्भपात किंवा स्टिलबर्थचा (जन्मजात मृत्यू) धोका अधिक असतो. तसेच एक्टोपिक प्रेग्नसीचा (Ectopic Pregnancy) धोका वाढतो.
चाळिशीतील प्रेग्नन्सी
चाळिशी किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांच्या वयोगटात गर्भधारणा होण्याची शक्यता फर्टिलिटी एक्स्पर्ट पूर्णपणे नाकारत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, महिलांमधल्या प्रत्येक ओव्ह्युलेटरी सायकलदरम्यान (Ovulatory Cycle) गर्भधारणेचं प्रमाण 40 ते 44 वयादरम्यान 5 टक्क्यांनी खालावतं. 45 पेक्षा अधिक वय असल्यास यात 1 टक्क्याने घट होते.
हे वाचा - आठवड्याभरात वजन कमी करायचंय? फॉलो करा या 6 सोप्या टिप्स
अमेरिकेच्या 'सेंटर फॉर डिसीज कंट्रोल'ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातल्या निम्म्या महिला वयाच्या चाळिशीनंतर प्रजननसंबंधी समस्यांचा सामना करतात. यादरम्यान गर्भधारणेत त्याच समस्या येतात, ज्या तिशीतल्या महिलांना भेडसावतात. परंतु, तज्ज्ञ म्हणतात, की अशा महिलांनी आश सोडू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman