जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती

अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती

अरे देवा! कोरोनापासून सुटका नाहीच; मोदी सरकारने महासाथीबाबत दिली मोठी माहिती

कोरोना पॅन्डेमिकचं (Corona pandemic) एन्डेमिक (Corona Endemic) होईल, असं आयसीएमआरने (ICMR) सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 जुलै : कोरोनाची महासाथ (Corona pandemic) येऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तुम्ही-आम्ही प्रत्येक जण कोरोनाव्हायरसपासून सुटका कधी मिळणार? कोविड-19 ची महासाथ कधी संपणार? याचीच प्रतीक्षा करत आहोत. कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाटही नियंत्रणात आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. पण प्रकरणं नियंत्रणात आल्यानंतर थोडं हायसं वाटतं आणि आता कोरोना आपल्यातून जाणार अशी आशा वाटू लागते. पण आता मोदी सरकारने कोरोनाबाबत मोठी माहिती दिली आहे. कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. कोविड-19 हा इन्फ्लुएंझासारखाच एन्डेमिक (Corona Endemic) होईल. म्हणजे तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही. त्याचा धोका कायम असेल. फ्लूसारखेच कोरोनाचे रुग्णही दिसून येतील, असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council for Medical Research) सांगितलं आहे. हे वाचा -  कडकनाथच्या नावानं चांगभलं! रोगप्रतिकार शक्तीसाठी उपयुक्त असल्याचा दावा आयसीएमआरच्या (ICMR) साथ आणि संसर्गजन्य विभागाचे प्रमुख समीरन पांडा यांनी सांगितलं, “इन्फ्लूंएझा ज्याला फ्लू म्हणूनही ओळखला जातो. 100 वर्षांपूर्वी याची साथ आली होती. पण आता तो एन्डेमिक आहे. तज्ज्ञांच्या मते, काही काळाने कोरोना हा इन्फ्लुएंझासारखा पॅन्डेमिकवरून एन्डेमिक स्टेजवर (Endemic stage) असेल . त्यानंतर याचा सर्वात जास्त धोका असलेल्या लोकांना दरवर्षी कोरोना लस घ्यावी लागेल” हे वाचा -  तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेत कोरोना तर नाही ना? खास डिव्हाइस करणार अलर्ट “व्हायरसमध्ये म्युटेशन होणं तसं काही नवं नाही. इन्फ्लूएंझा व्हायरसमध्येही बदल होत राहतो. आम्ही त्यानुसार लशीत थोडेफार बदल करतो. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लशी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सवर प्रभावी आहे. लस ही इन्फेक्शनपासून पूर्णपणे संरक्षण देते असं नाही पण आजाराची तीव्रता कमी करते”, असं पांडा यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात