जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Health Tips: काकडी खा, मस्त राहा! काकडी खाण्याचे फायदे वाचा

Health Tips: काकडी खा, मस्त राहा! काकडी खाण्याचे फायदे वाचा

Health Tips: काकडी खा, मस्त राहा! काकडी खाण्याचे फायदे वाचा

काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज (Calories) आणि भरपूर न्यूट्रिशन (Nutrition) मुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits of Cucumber) असते. काकडी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि  वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काकडीचा समावेश करु शकता. काकडी पचन सुधारण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेसाठी देखील चांगली आहे. काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोक जेवणासोबत सॅलडमध्ये काकडी खातात.  काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज (Calories) आणि भरपूर न्यूट्रिशन (Nutrition) मुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर (Benefits of Cucumber) असते. काकडी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. » काकडी आपल्याला हायड्रेटेड (Hydrate) राहायला आणि वेट लॉस (Weight Loss) मध्ये मदत करते. काकडीमध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरी असतात, तसेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. काकडीला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सचे पॉवरहाऊस म्हटले जाते. हे ही वाचा -  Ghee Or Butter: लोणी की तूप? उत्तम आरोग्यासाठी कशाची करावी निवड? » काकडी खाल्ल्याने पोटही भरते आणि तुम्हाला भरपूर पोषक तत्वेही मिळतात. काकडीत 95 टक्के पाणी असते, जे चयापचय मजबूत करते. काकडी खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते. काही लोक त्यांच्या शरीराच्या 40 टक्के गरजा पाणी खाऊन पूर्ण करतात. काकडी हा शरीरासाठी पाण्याचा चांगला स्रोत मानला जातो कारण काकडीत पाण्याचे प्रमाण 96 टक्क्यांपर्यंत असते. » काकडी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि मधुमेहाशी दोन हात करण्यास मदत करते. काकडीत व्हिटॅमिन के आढळते. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते आणि हाडांसाठी देखील चांगले आहे. व्हिटॅमिन के शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते. हे ही वाचा -  Black grapes: आरोग्यासोबत काळी द्राक्षे स्कीनसाठीही आहेत फायदेशीर; फेसपॅकसाठी असा करा वापर » काकडी केवळ आरोग्यदायी स्नॅक म्हणून आपल्यासाठी फायदेशीर नाही, तर घरगुती स्पामध्ये काकडी वापरणे देखील चांगले मानले जाते. काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने खूप फायदे होतात. डोळ्यांना सूज आली तरी काकडी फायदेशीर आहे. » अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की रोज काकडी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. काकडीत आढळणारे प्रोटीन्स आपल्या शरीरात कॅन्सरशी लढण्याची ताकद देतात. काकडी आपल्या शरीरातील कॅन्सर किंवा ट्यूमरच्या वाढीस प्रतिबंध करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात